रक्तदानासाठी सरसावले नांदा येथील युवक : नांदा फाटा येथे रक्तदान शिबिर #Blood donation #COVID-19 - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

रक्तदानासाठी सरसावले नांदा येथील युवक : नांदा फाटा येथे रक्तदान शिबिर #Blood donation #COVID-19

Share This
खबरकट्टा /आवाळपुर -

रक्तदान हेच जीवनदान, रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान‘ असे समजले जाते. शहरातील विविध रुग्णालयांमध्ये  रक्तपेढींमधील साठा कमी पडू लागला आहे. याच अनुषंगाने तरुणाईमध्ये रक्तदानाचे महत्त्व रुजविणे आणि त्यांना रक्तदानासाठी प्रेरित करण्याच्या अनुषंगाने ‘नांदा ग्रामवासीय युवक आणि ग्राम पंचायत नांदा संयुक्त विद्यमाने (ता. २६) रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ५१ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
देशांतच नाहीतर जगात कोरोना रोगांने थैमान घातले असतांना रक्तपेढीत रक्ताची कमतरतेमुळे अनेकांना भटकावे लागत आहे काही दिवसांपूर्वी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी रक्तदान करण्यासाठी आव्हान केले असता नांदा येथील युवकांनी ग्राम पंचायतीच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन केले. यावेळी शासकीय रक्तपिढी चंद्रपूर  चे कर्मचारी , पंकज पवार, जयशिंग डोंगरे रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी, जयवंत पचारे, रुपेश घुमे, लक्ष्मण नगराळे, रोहित गिराटकर यांची  उपस्थित होती.


रक्तदान शिबिर यशस्वीतेसाठी  गणेश पेंदोर सरपंच ग्राम पंचायत नांदा, पंढरी गेडाम ग्रामसेवक, अभय मुनोत ग्राम पंचायत सदस्य, सतीश जमदाडे,मुसा सिद्धिकी,प्रवीण पोटवडे, सचिन वनकर,महेश राऊत, सोनू बेग, हारून सिद्धिकी,घागरु कोटनाके,गणेश लोंढे ,यांनी सहकार्य केले

कायदा सुव्यवस्थेची पालन

देशात लॉक डाउन असल्यामुळे कलम १४४ लागून असल्याने संचारबंदी व जमावबंदी लागून असल्यामुळें कायद्याचे पालन करून जमाव न करता रक्तदान करण्यात आले.

हात धुतल्यानंतर रक्तदानाला प्रवेश

येणाऱ्या प्रत्येक रक्तदात्यांना हॅन्ड वाश ने हात धुतल्यानंतरच रक्तदानासाठी प्रवेश देण्यात आला रक्तदात्याला मास्क देऊन  आरोग्याची काळजी गजेऊन रक्तदान शिबिर पार पडले

रक्तदात्याला ग्राम पंचायतीकडून हॅन्ड वाश व मास्क वाटप

ग्राम पंचायत नांदा तर्फे रक्तदान करणाऱ्या रक्तदात्याला हॅन्ड वाश देऊन कोरोना रोगांपासून सावध राहण्याची माहिती देण्यात आली नेहमी हात स्वच्छ धुण्यासाठी हॅन्ड वाश व 100 मास्क वाटप करण्यात आले.