आणखी एका ऑडिओ क्लिप ने राजकीय क्षेत्रात खळबळ ! काँग्रेस आमदाराच्या विजयाचे फुटले बिंग #: पंजाला मत मारा भाजपचा प्रचार ? #bjp #congress - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

आणखी एका ऑडिओ क्लिप ने राजकीय क्षेत्रात खळबळ ! काँग्रेस आमदाराच्या विजयाचे फुटले बिंग #: पंजाला मत मारा भाजपचा प्रचार ? #bjp #congress

Share This

 • राजुरा विधानसभा निवडणुकीत भाजपा उमेदवाराच्या विरुद्ध तालुका महासचिवांनीच केला प्रचार
 • 'पंजाला मत मारा' अश्या प्रकारची अडिओ क्लिप वायरल
 • राजुरा विधानसभा प्रमुख खुशाल  बोंडे यांच्या नावाचाही उल्लेख 
खबरकट्टा / चंद्रपूर : कोरपना -

राजुरा विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार अँड.संजय धोटे यांच्या विरुद्ध त्यांच्याच पक्षातील कोरपना तालुका महासचिव नत्थू  ढवस यांनी प्रचार केल्याची आडिओ क्लिप सोशल माध्यमांवर वायरल होत आहे. कालच आमदार सुभाष धोटे यांची क्षेत्रातील जनतेप्रती असंवेदना दाखविणारी ऑडिओ क्लिप वायरल होत असताना सर्वत्र त्यांच्या विजयाच्या गुपिताची चर्चा राजकीय वर्तुळापासून सामान्य जनतेत रंगली आहे. 
     

                  क्लिक करा ऑडिओ ऐका २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत निसटता विजय मिळविणारे आमदार सुभाष धोटे यांच्या या यशात चक्क भाजपाने पंजाला दिलेला हाथ व माजी खासदार हंसराज अहिर समर्थकांनी दिलेली खरी साथ असल्याचे चर्चेत होते परंतु या ऑडिओ क्लिप ने सदर चर्चेला जिवंत रूप दिले आहे. 

भाजपचे उमेदवार अँड.संजय धोटे यांचा  ९ हजार मतांनी पराभव झाला व ते निवडणूकीत तिसऱ्या स्थानी होते.परंतु त्यांच्या या पराभवामागे त्यांच्या पक्षातील पदाधिकाऱ्यांचा हात असल्याचे यापुर्वीही दबक्या आवाजात पक्षात बोलल्या जात होते.तसेच काही पदाधिकऱ्यांनी  त्यापद्धतीची षडयंत्र राबवून अँड.संजय धोटे यांच्या विरुद्ध प्रचार केल्याचे बोलल्या जात आहे.
    
भारतीय जनता पार्टी राजुरा विधानसभा क्षेत्रात गटबाजी असून त्याचाच फटका अँड.संजय धोटे यांना निवडणूकित बसला.पक्षामध्ये निवडणूकी  आधीच तिकीटासाठी चढाओढ सुरू झाली होती.त्यामध्ये अँड.संजय धोटे,तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे,राजुरा विधानसभा प्रमुख खुशाल बोंडे यांच्यात चुरस होती,परंतु यामध्ये विद्यमान आमदार अँड.संजय धोटे यांना पक्षाने उमेदवारी जाहीर केली.
       
त्यांनतर पक्षातीलच काही पदाधिकाऱ्यांनी आपल्याच पक्षाच्या उमेदवारा विरुद्ध प्रचार केल्याचे उघडकीस आले.परंतू सदर बाबीची कोणतेही प्रमाणित तथ्य नसल्यामुळे पक्षात याबाबत कोणीही जास्त बोलले नाहीत.
        
परंतु  वायरल होत असलेल्या आडिओ क्लिप यामध्ये भारतीय जनता पक्षाचे कोरपना तालुका महासचिव नत्थू ढवस यांनी बाखर्डी येथील दत्तू कष्टी नामक कार्यकर्त्याशी संभाषण केल्याचे उघड झाले आहे.नत्थू ढवस हे खुशाल बोन्डे समर्थक म्हणून ओळखले जातात. 

क्लिप मधील संभाषणानुसार आपल्या सर्व लोकांना पंजा ला मतदान करायला लावा असे नत्थू ढवस म्हणत आहे.विशेष म्हणजे यामध्ये राजुरा विधानसभा प्रमुख खुशाल बोंडे यांच्याही नावाचा उल्लेख नत्थू ढवस यांनी केलेला आहे.

खुशाल बोन्डे हे हंसराज अहिर यांचे खंदे समर्थक असल्याचे सर्वश्रुत असून लोकसभा पराभवानंतर भाजपमध्ये भैया-भाऊ गटात प्रचंड दुफळी तयार होऊन त्याचा प्रत्यक्ष परिणाम विधानसभा निवडणुकीत झाल्याचे अनेक कार्यकर्ते आता उघडपणे बोलतात. या ऑडिओ क्लिप मुळे कार्यकर्त्यांत आधीच असलेल्या कुजबुजीला अधिक वाव मिळाला असून यासर्व प्रकारची पक्षातील वरिष्ठ दखल घेऊन काय कार्यवाही करतील याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे  असे टीम खबरकट्टा सोबत बोलताना एका वरिष्ठ कार्यकर्त्याने मत व आपल्याच माणसांमुळे पराभवास सामोरे जावे लागले याची खंत व्यक्त केली. या सर्व प्रकारावर खुशाल बोन्डे यांचेशी संपर्क साधला असता विधानसभा निवडणुकीत राजुरा निर्वाचन क्षेत्राची उमेदवारी मी मागितली होती तरीही देण्यात न  आल्यामुळे त्या काळात थोडीफार नाराजगी होती परंतु भोयेगाव येथील नथू ढवस आपलेच कार्यकर्ते असले तरीही या पद्धतीचा सल्ला मी कोणालाही दिला नसल्याचे त्यांनी कळविले. 

परंतु अहिर समर्थकांची नाराजगी व जातीय समीकरन प्रभावी ठरून काँग्रेस च्या उमेदवाराचा विजय होऊन भाजपाला आपली महाराष्ट्रातील एक जागा गमवावी लागली.