चिमूर नगर परिषद होणार टॅंकर मुक्त : टंचाई ग्रस्त प्रभागात चौदा बोअरवेलची निर्मिती : बंधाऱ्यात पुरेस्या पाण्याची साठवणुक - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

चिमूर नगर परिषद होणार टॅंकर मुक्त : टंचाई ग्रस्त प्रभागात चौदा बोअरवेलची निर्मिती : बंधाऱ्यात पुरेस्या पाण्याची साठवणुक

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : चिमूर प्रतिनिधी -


        
चिमूर नगर परिषद क्षेत्रातील प्रभाग क्रमांक १ ते ५ ,९ व १३ मध्ये दरवर्षी उन्हाळ्यात टँकरणी पाणी पुरवठा करण्यात येत होते .मात्र या पावसाळ्यात मोठया प्रमाणात पाऊस आल्याने जल साठा वाढलेला आहे .त्यात भर म्हणुन चवदाव्या वित्त आयोगाच्या निधी मथुन टंचाई ग्रस्त प्रभागात १४ बोअरवेल निर्माण करण्यात येणार असुन त्यापैकी ९ बोअरवेल पुर्ण झाल्या आहेत .यामूळे चिमूर नगर परीषद टँकर मुक्त होणार असल्याची माहीती नगर परिषद पाणी पुरवठा विभागातुन देण्यात आली.


           
नगर परीषद क्षेत्रातील प्रभाग क्रंमाक १ मधील लुंबीनी नगर , प्रभाग क्रमांक २ मधील महाकाली कॉलणी ,पिंपळनेरीतिल नविन वस्ती , प्रभाग क्रमांक ३ मधील वडाळा यथील जुनी वस्ती , प्रभाग क्रमांक ४ मधील राजीव गांधींनगर ,प्रभाग पाच मध्ये भास्कर बावनकर यांचे घराजवळ ,मडावी ग्रामसेवक यांचे घराजवळ , भैय्युजी महाराज विद्यालय परीसर ,दुर्गा माता मंदिर परीसर ,निर्मला माता केंद्र परीसर ,प्रभाग क्रमांक ८ मधील आठवले कॉलेज जवळ,प्रभागा क्रमांक ९ मधील कवडशी रोडी ,प्रभाग क्रमांक १३ मधील कटारे यांचे घरा जवळील परीसरातील नागरिकांच्या मागणी नुसार १४ व्या वित्त आयोगाच्या निधी मधुन १४ बोअरवेलची निर्मिती होत आहे .त्यापैकी ९ बोअरवेल पुर्ण झाल्या असुन पाच बोअरवेल लवकरच होणार आहे.
मागील काही वर्षात कमी प्रमाणात झालेल्या पावसाने फरवरी महिन्या पासुनच चिमूर नगर परीषद क्षेत्रातील काही प्रभागात पाणी टंचाई निर्माण झाली होती. ज्यामूळे नळ योजने द्वारे होणाऱ्या पाणी पुरवठया मध्ये कपात करून एक दिवसा आड पाणी पुरवठा करण्यात आला होता .त्यामूळे नगर परीषद प्रशासणाने चिमूर येथील जल शुद्धी केंद्रा जवळील बंधाऱ्याजवळील नदी पात्रात नांगर चालविले होते .पावसाळ्या पुर्वी या बंधाऱ्यामध्ये तसेच सोनेगावच्या बंधाऱ्या मध्ये पाणी अडविण्या करीता पाटया टाकल्याने व लिकेज बंद केल्याने या दोन्ही बंधाऱ्यात उन्हाळ्यात पुरेल येवढा जलसाठा साठवणुक झाली .यामूळे चिमूर नगर परीषद क्षेत्रातील बहुतेक प्रभागात नळ योजनेद्वारे पुरेसा पाणी पुरवठा करण्यात येणार असल्याची माहीती पाणी पुरवठा विभागाने दिली आहे .
  
१४ व्या वित्त आयोगाच्या निधीतुन १४ बोअरवेल निर्मीती होत असली तरी नगर परीषद क्षेत्रातील पाण्याची मागणी पाहता पाणी टंचाई निधी मधुन तिस बोअरवेलची आवश्यकता आहे . त्यामुळे याची मागणी जिल्हाधिकारी यांचेकडे आम्ही करणार आहोत .विनोद ढाकुणकर, नगर सेवक,चिमूर नगर परिषद.