दुर्गापूर येथील घरफोडीचा गुन्हा उघडकीस, एका आरोपीसह गुन्ह्यातील मुद्देमाल केला हस्तगत - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

दुर्गापूर येथील घरफोडीचा गुन्हा उघडकीस, एका आरोपीसह गुन्ह्यातील मुद्देमाल केला हस्तगत

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : 


दुर्गापूर येथील घरफोडीचा गुन्हा पोलिसांनी उघडकीस आणून एका आरोपीसह गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत केला आहे. फिर्यादी महिला बाहेरगावी गेली असता कोणीतरी अज्ञात इसमाने घराचे कुलूप आणि आलमारीचे लाॅक तोडून सोने -चांदीचे दागिने, रोख रक्कम आणि इतर साहित्य असा एकूण ५५ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. 

याबाबत सदर महिलेने पोलिस स्टेशन दुर्गापूर येथे ९ मार्च २०२० रोजी तक्रार केली. यावरून पोलिसांनी पोलिस स्टेशन दुर्गापूर येथे अपराध क्रमांक ९७/२०२० कलम ४५४, ४५७, ३८० भादंवि अन्वये गुन्हा दाखल केला व तपास कार्य सुरू केले. दरम्यान, एका संशयित इसमास ताब्यात घेवून विचारपूस केली असता त्याच्या ताब्यात असलेली टीव्ही ही त्याने ९ मार्च २०० रोजी फिर्यादीच्या घरून चोरी केल्याची कबुली दिल्याने 19 हजार रुपये किंमतीची टीव्ही हस्तगत करून आरोपीस अटक करण्यात आली. 

सदर कारवाई चंद्रपूरचे पोलिस अधीक्षक डाॅ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनात पोलिस स्टेशन दुर्गापूरचे पोलिस निरीक्षक खोब्रागडे यांच्या नेतृत्वात पोलिस उपनिरीक्षक सोनोने, पोलिस हवालदार गौरकार, मंजुळकर, पोलिस नाईक उमेश वाघमारे यांनी केली आहे.