भाजपा चंद्रपूर जिल्हाध्यक्ष्यांची मोठी कार्यवाही : ब्रम्हपुरी शहर अध्यक्ष जगदीश तलमले ; तालुका अध्यक्ष : नानाजी तुपट पक्षातून निष्कासित : कोरपना व गोंडपिपरी तालुक्यातील पदाधिकाऱ्यांवरही अशीच कार्यवाही लवकरच? : कोरपण्यात पंजा ला मत मारा भाजपा पदाधिकाऱ्यांचा प्रचार तर गोंडपिपरीतील लोकप्रतिनिधींनी शेतकरी संघटनेला केलेली मदत हाकलपट्टीस कारणीभूत ठरण्याची शक्यता !#bjp - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

भाजपा चंद्रपूर जिल्हाध्यक्ष्यांची मोठी कार्यवाही : ब्रम्हपुरी शहर अध्यक्ष जगदीश तलमले ; तालुका अध्यक्ष : नानाजी तुपट पक्षातून निष्कासित : कोरपना व गोंडपिपरी तालुक्यातील पदाधिकाऱ्यांवरही अशीच कार्यवाही लवकरच? : कोरपण्यात पंजा ला मत मारा भाजपा पदाधिकाऱ्यांचा प्रचार तर गोंडपिपरीतील लोकप्रतिनिधींनी शेतकरी संघटनेला केलेली मदत हाकलपट्टीस कारणीभूत ठरण्याची शक्यता !#bjp

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : 


ब्रह्मपुरी भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष नानाजी तुपट व शहराध्यक्ष जगदीश तलमले यांना भाजपा जिल्हाध्यक्ष हरिश शर्मा यांनी  पक्षविरोधी कारवायाबाबतकारणे दाखवा नोटीस बजावली होती. 


सातत्याने पक्ष विरोधी व पक्ष नेतृत्वाविरोधात कृती करीत असल्याचा ठपका या दोघांवर नोटीसमधून ठेवण्यात आला आहे.भारतीय जनता पार्टीतर्फे १जानेवारी ला झालेल्या पं. स.सभापती व उपसभापती निवडणुकीसाठी ब्रह्मपुरी विधानसभा अंतर्गत ब्रह्मपुरी,सिंदेवाही, सावली या तीन पं. स.निवडणुकीची जाबबदारी विधानसभा पालक, महाराष्ट्र प्रदेश भाजपा कार्यकारिणी सदस्य, माजी जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार प्रा.अतुल देशकर यांच्याकडे देण्यात आली होती.देशकर यांनी २१ डिसेंबरला भाजपा तालुका अध्यक्ष,महामंत्री,प्रमुख पदाधिकारी यांची व ९ पं.स. सदस्यांची बैठक स्थानिक विश्राम गृहात घेतली होती. त्यात एकत्रीतपणे निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय सर्वानमुते ठरला.२८डिसेंबरला दुपारी १ वाजता येथील विश्रामगृहात पुन्हा या सर्वांची बैठक झाली. सर्व ९ भाजपा पं. स.सदस्यांना २९ डिसेंबरला सकाळी १० वाजता एकत्रीत करण्याचे निश्चित झाले. तेथून सर्वांना निवडणुकीपर्यंत बाहेर गावी नेण्याचे ठरले. तसे तालुकाध्यक्षांना सूचित करण्यात आले. वाहन व्यवस्थासुद्धा तालुकाध्यक्षांच्या उपस्थितीत करण्यात आली.सोबतचे प्रमुख कार्यकर्ते ठरविण्यातआले. विशेष म्हणजे, हे सर्व तालुकाध्यक्षांच्या संमतीने ठरले.मात्र, तालुका भाजपा अध्यक्षांनी २८ ला सायंकाळी आपल्या ब्रह्मपुरीतील मुलीच्या निवासस्थानी निवडक ५ भाजपा पं. स.सदस्यांना बोलावून स्वतंत्र गट केला.

फोटो : तालुका अध्यक्ष : नानाजी तुपट 

त्यातील एका पं. स.सदस्याला हा निर्णय पक्ष विरोधी वाटल्याने त्यांनी तेथून काढता पाय घेतला. भाजप तालुकाध्यक्षांनी बाकी ४ भाजपा पं. स. सदस्यांना परगावी पाठविले, याची माहिती वरिष्ठांना दिली नाही.चंद्रपूरला  बोलावूनही ४ सदस्यांना घेऊन पोहोचले नाही व सभापती, उपसभापती निवडणूक पक्षानेठरविलेल्या उमेदवार विरोधात उभे ठाकण्यास त्या ४सदस्यांना बाध्य केले, असा आरोप भाजप जिल्हाध्यक्षांनी ठेवून हे कृत्य व नंतर घेतलेल्या पत्रपरिषदेने पक्षाची प्रतिमा मलीन झाल्याचे म्हटले आहे. शहराध्यक्ष तलमले यांनी या सर्व प्रकरणात तालुकाध्यक्षांना साथ दिल्या नेत्यांनाही कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. 

फोटो : शहर अध्यक्ष : जगदीश तलमले 

भाजपाचे ब्रम्‍हपूरी तालुकाध्‍यक्ष नानाजी तुपट आणि भाजपा ब्रम्‍हपूरी शहर अध्‍यक्ष जगदीश तलमले यांना दिनांक 18 मार्च 2020 पासून भारतीय जनता पार्टीतुन निष्‍कासित करण्‍यात आले असल्‍याची माहिती भाजपाचे जिल्‍हा सरचिटणीस संजय गजपूरे यांनी दिली आहे.

ब्रम्‍हपूरी पंचायत समिती सभापती व उपसभापती निवडणूकीत पक्षविरोधी कारवाया केल्‍याबद्दल नानाजी तुपट आणि जगदीश तलमले यांच्‍यावर ही कारवाई करण्‍यात आल्‍याचे त्‍यांनी प्रसिध्‍दी पत्रकाद्वारे जाहीर केले आहे. ब्रम्‍हपूरी पंचायत समितीच्‍या सभापती व उपसभापती निवडणूकीत एकूण 10 सदस्‍यांपैकी 9 सदस्‍य निवडून येत भाजपाला स्‍पष्‍ट बहुमत प्राप्‍त झाले होते. त्‍यामुळे जानेवारी 2020 मध्‍ये झालेल्‍या सभापती, उपसभापती निवडणूकीत पक्षाच्‍या उमेदवाराला विजयाबद्दल कोणतीही शंका नव्‍हती. मात्र नानाजी तुपट आणि जगदीश तलमले यांनी पक्षविरोधी कारवाया केल्‍याने या निवडणूकीत भाजपाला अडचणीला सामोरे जावे लागले. 

सभापतीपदी भाजपाचा उमेदवार निवडून आला मात्र उपसभापती निवडणूकीत कॉंग्रेस सदस्‍यांशी हातमिळवणी करून वरील दोघांनी भाजपाच्‍या अधिकृत उमेदवाराला पराभूत करण्‍याच्‍या प्रक्रियेत महत्‍वपूर्ण भुमीका बजाविली. यासंदर्भात त्‍यांना भाजपा जिल्‍हाध्‍यक्ष (ग्रामीण) हरीश शर्मा यांनी कारणे दाखवा नोटीसही बजाविली होती. आता नानाजी तुपट आणि जगदीश तलमले यांच्‍यावर भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष हरीश शर्मा यांनी निष्‍कासनाची कारवाई केली असल्‍याचे भाजपाचे जिल्‍हा सरचिटणीस संजय गजपूरे यांनी प्रसिध्‍दी पत्रकाद्वारे जाहीर केले आहे. 

याच धर्तीवर राजुरा विधानसभा निवडणुकीत पक्षविरोधी कार्यवाया करणाऱ्या विविध पदाधिकारी व लोकप्रतिनिधींविरुद्ध अनेक पुरावे समोर आले आहेत.  कोरपना तालुक्यातील खुशाल बोन्डे यांचे समर्थक असणारे काही पदाधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक पंजाचा प्रचार केला असल्याची ऑडिओ क्लिप सुद्धा माध्यमांवर फिरत आहे.  तर गोंडपिपरी तालुक्यातील एका वरिष्ठ नेत्याने निवडणुकीदरम्यान नागपूर येथे शेतकरी संघटनेच्या उमेदवारांची घेतलेली गुप्त बैठक उघड झाली असून अनेक लोकप्रतिनिधींनी शेतकरी संघटनेला सहकार्य केल्याचे अनेक पुराव्यानिशी दाखले जिल्ह्यातील वरिष्ठ नेत्यांसमोर ठेवले जाणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. 

मुख्य म्हणजे गोंडपिपरीतील याच पक्षविरोधी कार्यवाया करणाऱ्या अनेकांनी तालुका प्रमुख पदाकरिता दावेदारी ठोकली असल्याने याबातच चा निर्णय पूर्ण चाचपनी करूनच घेतला जाण्याची शक्यता असून तथ्य आढळ्यास या सर्वांवर सुद्धा पक्षातून निष्कासित होण्याची वेळ उभी ठाकली आहे. त्यामुळे भाजपा चंद्रपूर जिल्ह्यात काय काय बदल घडतील याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.