जिल्हा शल्यचिकित्सकांच्या खुर्चीत बसल्याने हंसराज अहिर येणार अडचणीत? : रामू तिवारी यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार #bjp #hansraj ahir - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

जिल्हा शल्यचिकित्सकांच्या खुर्चीत बसल्याने हंसराज अहिर येणार अडचणीत? : रामू तिवारी यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार #bjp #hansraj ahir

Share This
जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या खुर्चीवर बसले अहीर !


खबरकट्टा / चंद्रपूर :- 

कोणतेही संविधानीक पद नसताना जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या खुर्चीवर बसून बैठक घेणाऱ्या हंसराज अहिरांवर कारवाई करण्याची मागणी रामू तिवारी यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.14 मार्च 2020 रोजी माजी केंद्रीय राज्य मंत्री हंसराज अहिर यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे बैठक घेतली. हंसराज अहिर यांच्याकडे कोणतेही संविधानीक पद नसून ते फक्त सामान्य नागरिक आहे. तरीदेखील ते चक्क जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या खुर्चीवर बसून अधिकार्‍यांना जाब विचारत असल्याचे वृत्तपत्रात प्रकाशित झालेल्या बातम्यातील फोटोमध्ये दिसून येत आहे. 


हा प्रकार अत्यंत गंभीर असून त्या खुर्चीचा अवमान आहे. त्यामुळे खुर्ची देणाऱ्या जिल्हा शल्य चिकित्सक, अधिकारी व खुर्चीवर बसणारे हंसराज अहिर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी  रामू तिवारी यांनी केली आहे.