अभिनंदन ! : रोहन रामकृष्ण धोटे समाजरत्न पुरस्काराने सन्मानित ! #betifoundation - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

अभिनंदन ! : रोहन रामकृष्ण धोटे समाजरत्न पुरस्काराने सन्मानित ! #betifoundation

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : राजुरा -अभिनंदन !
बेटी फौंडेशन वणी तर्फे बालपणापासून विज्ञान आणि तंत्रज्ञान यात विशेष आवड असणाऱ्या रोहन रामकृष्ण धोटे   या दिलासाग्राम कॉन्व्हेंट स्कूल बल्लारपूर चा 10 व्या वर्गातील विद्यार्थ्याला  समाजरत्न पुरस्काराने  सन्मानित करण्यात आले. 

आतापर्यंत रोहन धोटे याने अनेक विज्ञान प्रदर्शनात सहभाग घेतला आहे. त्यात एरोप्लेंन, ड्रोन याचे वरकिंग मॉडेल त्यानें आठव्या वर्गात असताना  स्वतः तयार केले. विज्ञान प्रश्नमजुषा यात सुद्धा तो नियमित सहभागी होत असतो. नुकतेच तारापूर मुंबई  फन फॉर सायन्स  ने आयोजित स्पर्धेत त्याला सन्मानित करण्यात आले होते. 

वणी येथे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधुन महिला आणि  समाजातील विविध क्षेत्रांत कार्यकरणार्यांना,समाजरत्न, आंतरराष्ट्रीय नारीरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले,सन्मानपत्र , गौरवचिन्ह, मेडल, देऊन रोहन चा सन्मान करण्यात आला.

रोहनच्या यशस्वितेबद्दल मुख्याद्यापीका सिस्टर मारिया शिक्षकवृंद , विद्यार्थी मित्र वर्ग यांनी रोहनला शुभेच्छा दिल्या.व भविष्यात असेच प्रयोगशील राहून  उंच कामगिरी करावी अशी आशा व्यक्त केली.


ह्या  भव्य सोहळ्याला संपुर्ण राज्यातून आणि बाहेरुनही मान्यावर उपस्थित होते, कार्यक्रमाचे नियोजन,   कार्यक्रमाला सलग तिनवेळा आमदार म्हणुन निवडुन आलेले माजी आमदार वामनरावजी कासावार हे अध्यक्ष स्थानी,तर उद्घाटिका म्हणुन गिताता रविंन्द्र निखार ह्या उपस्थित होत्या,माजि नगराध्यक्ष राकेश खुराणा, इंशुरंस अॕडवाईजर शहाबुद्दिन अजाणी, बेटी फाउंडेशन चे सचिव विनोद दरेकर,यवतमाळ जि.पोलिसपाटिल संघटनेचे अध्यक्ष रुपेश पाटिल सावरकर , वणीचे सामाजिक कार्यकर्ते राजुभाऊ तुराणकर ,मोटीवेशनल स्पिकर नरेंन्द्र पलांदुरकर, भद्रावती भुषण तिराणीक,समाजसेवक लेखक कवी विजय चिखले हे मुख्य अतिथी म्हणुन मंचावर उपस्थित होते.

समाजातिल कर्तव्यदक्ष एकावन्न महिलांना , हुशार  कलावंत मुलींना, आणि साहित्य व समाजबांधिलकी जपणाऱ्या विस  पुरुषांना आंतरराष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले.

कार्यक्रमात  अध्यक्षिय भाषणात मा. कासावार म्हणाले, कर्तव्यदक्ष महिलांचा सन्मान करुन महिलांच्या पंखाना बळ देणारा हा पुरस्कार असुन येणाऱ्या पिठ्यांनाही प्रेरणा देणारा हा दिमाखदार सोहळा , नाचगाण्याचे कार्यक्रम करण्यापेक्षा असे प्रेरणादाई कार्यक्रम राबवुन सर्वांना प्रोत्साहन आणि आनंद व्दिगुणीत करणारा सोहळा असे भरभरुन कौतुक केले.

हा कार्यक्रम यशस्वि करण्यासाठी बेटी फाँडेशनच्या अध्यक्षा प्रिती माडेकर , सुनंदाताई गुहे, वृंदाताई काळे, समिक्षा माडेकर , प्रिया निखार ,दर्शना पाटिल ,अमित माडेकर , प्रविण ढुमणे आणि विनोद दरेकर ह्यांनी अथक परिश्रम घेतले.


रोहन च्या भरारीबद्दल टीम खबरकट्टा तर्फे हार्दिक अभिनंदन व उज्वल भविष्याकरिता अनंत शुभेच्छा.. !!