गोंडवाना विद्यापीठाच्या परीक्षा स्थगित - संचालक डाॅ. अनिल चिताडे यांची माहिती ; एप्रिल मध्ये होणाऱ्या सर्व लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा पुढे ढकलल्या # All of Gondwana Universty Examinations are postpone - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

गोंडवाना विद्यापीठाच्या परीक्षा स्थगित - संचालक डाॅ. अनिल चिताडे यांची माहिती ; एप्रिल मध्ये होणाऱ्या सर्व लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा पुढे ढकलल्या # All of Gondwana Universty Examinations are postpone

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :गडचिरोली :27मार्च



कोरोना विषाणूंच्या प्रसारावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याकरिता गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली अंतर्गत घेण्यात येणाऱ्या सर्व लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा कुलगुरू यांच्या मान्यतेने पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आल्याची माहिती गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डाॅ. अनिल चिताडे यांनी दिली आहे.

कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने १४ एप्रिल २०२० पर्यंत कलम १४४ अन्वये संचारबंदी लागू केली असल्यामुळे विद्यापीठाच्या ९ एप्रिल २०२० पासून सुरू होणारया सर्व पदवी व पदव्युत्तर विभागाच्या लेखी परीक्षा स्थगित करण्यात आलेल्या आहेत.

परीेक्षेचे नवीन वेळापत्रक यथायोग्य कळविण्यात येईल. तसेच १ एप्रिल ते ८ एप्रिल २०२० दरम्यान महाविद्यालय स्तरावर घेण्यात येणारया प्रात्यक्षिक परीक्षा सुद्धा स्थगित करण्यात आलेल्या आहेत याची गोंडवाना विद्यापीठाशी संलग्नीत सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य, विद्यार्थी व संबधितांनी नोंद घ्यावी, असे संचालक डाॅ. अनिल चिताडे यांनी २६ मार्च २०२० च्या पत्रान्वये कळविले आहे.