9 दिवसापासून बेपत्ता बालिकेवर अत्याचार करून खून ! #murder - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

9 दिवसापासून बेपत्ता बालिकेवर अत्याचार करून खून ! #murder

Share This
खबरकट्टा / महाराष्ट्र : नऊ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या उमरखेड तालुक्यातील हातला येथील बालिकेवर लैंगिक अत्याचार करून खून करण्यात आला. ही घटना काल  शुक्रवारी दुपारी उघडकीस आली. बालिकेच्या वर्गमैत्रिणीच्या वडिलानेच अत्याचार करून खून केल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी पोफाळी पोलिसांनी आरोपी गजानन विठ्ठल भुरके (४०), रा.मुळावा, ता. उमरखेड यास अटक केली. बालिका मुळावा येथील शाळेत दुसरीत शिकत होती. १२ मार्चला हातला येथून ती सायकलने शाळेत जायला निघाली. मात्र आरोपीने तिला शाळेत पोहचण्यापूर्वीच आपल्या दुचाकीवर नेले. ती घरी न आल्यामुळे पालकांनी शोध घेतला. पालकांनी पोफाळी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी बालिकेच्या शोधासाठी पाच पथक तयार केली. स्थानिक गुन्हे शाखा व स्थानिक पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास घेतला असता, बालिकेस आरोपीने दुचाकीवरून नेल्याचे व आरोपी मुळावा येथील असल्याचेच समजले. मात्र आरोपी घरून पसार झालेला होता. त्यानंतर त्याचे लोकेशन घेऊन शोध घेतला. तो खंडाळा पोलीस हद्दीतील लोहारा तांडा येथे असल्याच समजले. तिथेही आरोपी दुचाकी सोडून फरार झाला होता. त्यानंतर परिसरात रात्रभर शोध घेण्यात आला. शुक्रवारी रोहडा परिसरात आरोपीला ताब्यात घेतले.आरोपीने गुन्ह्यची कबुली दिली. पोलिसांनी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.