कठीण समय येता कोन कामास येतो - रैन बसेरा शेल्टर होम : रामगुंडम येथून पायदळ येणाऱ्या 70 मजुरांना आसरा : मुनगंटीवारांच्या मार्गदर्शनात राजू दारी, आशिष देवतळे, गुलशन शर्मा यांची कार्यतपरता : महिला बालकांसहित सर्व मजुरांची वैद्यकीय तपासणी व संपूर्ण व्यवस्था #SHELTERHOME #COVID-19 - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

कठीण समय येता कोन कामास येतो - रैन बसेरा शेल्टर होम : रामगुंडम येथून पायदळ येणाऱ्या 70 मजुरांना आसरा : मुनगंटीवारांच्या मार्गदर्शनात राजू दारी, आशिष देवतळे, गुलशन शर्मा यांची कार्यतपरता : महिला बालकांसहित सर्व मजुरांची वैद्यकीय तपासणी व संपूर्ण व्यवस्था #SHELTERHOME #COVID-19

Share This
आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांची रैन बसेरा -शेल्टर होम ची संकल्पना बल्लारपूर येथे नगर परिषद च्या पुढाकारातून  बचत भवन येथे 28 मार्च 2020 ला सुरु करण्यात आली होती याचा प्रत्यक्ष लाभ कोरोनाच्या संकटात असहाय्य, निराधार लोकांना होत असल्याचे समाधानकारक चित्र आता दररोज समोर येत आहे.खबरकट्टा / चंद्रपूर : बल्लारपूर -

आज दि.29/03/2020 ला रामगुंडम  येथून बल्लारपुर पर्यंत जवळपास 70 मजूर महिला -बालकांसहित पायदळ प्रवास करत येत असल्याची माहिती फोन द्वारे आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना दिली असता त्यांनी त्वरित बल्लारपूर येथील मदत कार्य चमू ला कळवून संपूर्ण सोय करण्यास सांगितले. या मजुरांमध्ये मध्ये महिला व लहान मुलांचा सुद्धा समावेश होता आणि हे लोकांना जेवन व पाण्याची काहीच सुविधा नाही हे कळताच बल्लारपूर येथील राजू दारी(भाजपा ट्रांसपोर्ट सेल जिल्हाध्यक्ष ),आशिष देवतळे(भाजयुमो जिल्हा महामंत्री), गुलशन शर्मा(भाजपा ट्रांसपोर्ट सेल तालुका अध्यक्ष )यांनी त्वरित या मजूर ताफ्याशी संपर्क केला.त्यांचेशी भेट घेतल्यावर असे लक्षात आले की हे मजूर रामगुंडम वरून पायदळ प्रवास करत मध्यप्रदेश येथे जाण्यास निघालेले आहेत. 

या सर्व मजुरांची भेट घेऊन कोरोनाचा धोका व प्रवास न करण्याचे महत्व सांगून सर्वांना भाजप जेष्ठ नेते चंदनसिंग चंदेलजी, नगराध्यक्ष हरीश शर्मा, नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विपिन मुद्दा, ठानेदार भगत साहेब यांच्या नेतृत्वात रैन बसेरा -शेल्टर होम मध्ये आसरा देण्यात येऊन त्वरित वैद्यकीय तपासणी करण्यात येऊन  जेवणापासून ते राहण्यापर्यंत सर्व सोई सुविधा देण्यात आल्या. 


कोरोनाच्या या संकटकाळात मानवतेच्या भावनेतून आम्हाला मदत करून जीवनदानाचेच कार्य केले असल्याची भावना या मजुरांनी व्यक्त केली आहे. 

या मदत्कार्यास भाजपा शहर अध्यक्ष काशीजी सिंग, मनीषजी पांडे, मुन्नाजी ठाकुर, श्रीकांतजी उपाध्याय, महेश धरक, सोनू दारी, विक्की दूपारे यांनी मोलाचे सहकार्य केले.