कर्मचाऱ्यांचा आनंद क्षणिक ठरला, सरकारी कार्यालये सुरूच राहणार #Corona Effect #COVID-19 #corona virus #ministry of maharashtra - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

कर्मचाऱ्यांचा आनंद क्षणिक ठरला, सरकारी कार्यालये सुरूच राहणार #Corona Effect #COVID-19 #corona virus #ministry of maharashtra

Share This
खबरकट्टा / महाराष्ट्र :  17 मार्च 2020 (7:30PM)


कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी पुढील 7 दिवस सरकारी कार्यालयं बंद ठेवण्याचा निर्णय सरकारनं घेतला, अशा बातम्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या. मात्र, सरकारी कार्यालय 7 दिवस बंद राहणार नसल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे. तसेच, फिफ्टी-50 बेसेसवर काही प्रमाणात कामकाज करता येईल का? याबाबात विचार सुरू असल्याचंही उद्धव ठाकरेंनी सांगितलंय. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत 7 दिवस सरकारी कार्यालयं आणि आस्थापनं बंद असतील, असा निर्णय घेतल्याच्या सोशल मीडियात आलेल्या बातम्या चुकीच्या असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटले. मंत्रिमंडळ बैठकीनंतर उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली. त्यामुळे, सरकारी कर्मचाऱ्यांचा हिरमोड झाला आहे. कारण, 7 दिवस सरकारी कार्यालय बंद या अफवेने सरकारी कर्मचाऱ्या्ंमध्ये आनंदाचे वातावरण पसरले होते. तर, आता सुट्ट्या म्हटल्यावर गावी जाऊ.. असेही अनेकांना वाटत होते. रेल्वे किंवा बसच्या रिझर्व्हेशनचेही बुकींग पाहण्यात येत होते. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर सरकारी कर्मचाऱ्यांचा आनंद क्षणिक ठरला.

--------------------------------------------------------
सर्व सरकारी कार्यालये 7 दिवस बंद राहणार???

खबरकट्टा / महाराष्ट्र :  17 मार्च 2020-5:10PMकोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सर्व सरकारी कार्यालये 7 दिवस बंद ठेवण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. आज सह्याद्री अतिथीगृहावर महत्त्वाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
काल मंत्रालयात एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे हे कळाल्यावर प्रशासनाने आज मोठं पाऊल उचललं आहे. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना आता 7 दिवस सुट्टी मिळणार आहे.राज्यातील जिल्हाधिकारी कार्यालये तसंच तहसीलदार कार्यालय तसंच विविध सरकारी कार्यालये बंद राहणार आहेत. दुसरीकडे मुंबईची लाईफ लाईन लोकल देखील टप्प्याटप्प्याने बंद करण्याचा विचार शासन करत आहेत.


दरम्यान, सगळ्या खासगी कार्यालयांना वर्क फ्रॉम होम देण्याच्या सूचना राज्य सरकारने केल्या आहेत. तसंच येणाऱ्या काही दिवसांत अनावश्यक  गर्दी टाळण्यासाठी लोकांनी देखील अधिक जागरूक राहणं गरजेचं आहे.