खबरकट्टा / जाहीर थोडक्यात -
दरवर्षी 1 एप्रिल 2020 रोजी बरेच लोक आपले मित्र परिवार हित संबंधितांना, नातेवाईकांना एप्रिल फुल करत असतात. त्यातून एक वेगळ्या प्रकारचा आनंद मिळतो असतो. परंतु सद्यस्थितीत आपल्यावर असणारे कोरोनाव्हायरसचे संकट तसेच संचारबंदी यामुळे आपण कोरोनाव्हायरसच्या संदर्भाने कोणत्याही प्रकारचे लोकांच्यामध्ये संभ्रम निर्माण करतील अश्या प्रकारचे मेसेज टाकू नये.
सोशल मीडियावर व्हायरल करू नये. जेणेकरून लोकांच्यामध्ये संभ्रमावस्था निर्माण होऊन संचारबंदीचे उल्लंघन होणार नाही. प्रशासनावर ताण निर्माण होणार नाही. आपण सर्व सुज्ञ नागरिक आहात आपण असे करणार नाही अशी आपल्याकडून अपेक्षा आहे. जर अशा स्वरूपाचे मेसेज आपल्याकडून सोशल मीडियावर व्हायरल झाल्यास व्हायरल करणाऱ्यास व त्या ग्रूप अॅडमिनला, कलम 68 नुसार प्रतिबंध करण्यात येणार आहे.
असे कृत्य केल्यास महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 140 तसेच भारतीय दंड सहिता कलम 188 नुसार त्याच्यावर गुन्हे दाखल होतील.
टिप:- (ग्रप अॅडमिन ने आत्ताच आपल्या ग्रुपमधील सर्व सदस्यांना सूचना द्याव्यात. तसेच सेटिंग मध्ये जाऊन फक्त ग्रुप अॅडमिन मेसेज सेंड करेल असे सेटिंग करावे.)