घरगुती गॅस सिलेंडर 62 रुपयांनी झाले स्वस्त #LPG - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

घरगुती गॅस सिलेंडर 62 रुपयांनी झाले स्वस्त #LPG

Share This
खबरकट्टा / थोडक्यात -


विना अनुदानित एलपीजी सिलेंडर (14.2 किलो) 62 रुपयांनी स्वस्त झाले आहे. एप्रिलमध्ये ग्राहकांना सिलेंडरसाठी 779 रुपये द्यावे लागणार आहे. 

सलग दुसर्‍या महिन्यात सिलेंडरच्या किंमतीमध्ये घसरण होत आहे. बुधवार 1 एप्रिल सकाळपासून हे नवीन दर लागू झाले आहेत.

यांच्या किंमतीही घट : तेल कंपन्यांनी व्यावसायिक सिलेंडर्स (19 किलो) मध्येही 96 रुपये कमी केले आहेत. कमर्शिअल सिलेंडरची किंमत आता 1369.50 रुपये आहे. पाच किलो सिलेंडरही 21.50 रुपयांनी कमी करून 286.50 रुपये झाला आहे.

◾ एवढे अनुदान जमा होणार? : 

LPG सिलेंडर्सच्या बाजारभावामध्ये कपात झाल्यानंतर आता 233 रुपये ग्राहकांच्या खात्यात अनुदान म्हणून जातील. यानंतर ग्राहकांना अनुदानित सिलेंडरची किंमत जवळपास 516 रुपये पडेल.

एप्रिलमध्ये सिलेंडरचे दर :
▪️ 14.2 किलो : 779.00
▪️ 5 किलो : 286.50
▪️ 19 किलो : 1369.50