पडोली पोलिसांच्या सतर्कतेने मोठी कारवाही : होळी उत्सवासाठी येणारी 42लाखाची दारू जप्त #darubandi - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

पडोली पोलिसांच्या सतर्कतेने मोठी कारवाही : होळी उत्सवासाठी येणारी 42लाखाची दारू जप्त #darubandi

Share This
होळीच्या उत्सवाला येणारी दारू पडोली पोलिसानी पकडली, आतपर्यंतची पडोली पोलिस स्टेशन अंतर्गत मोठी कारवाई, ट्रक फेल झाल्याने डाव फसला.

खबरकट्टा / चंद्रपूर : 
येणाऱ्या होळी च्या उत्सवाला दारूची मोठ्या प्रमाणात होणारी मागणी पूर्ण करण्यासाठी दारू माफियांनी अनेक क्लुप्त्या लढवून लाखों रुपयाची दारू चंद्रपूर जिल्ह्यात आणण्याची कवायद सुरू केली असली तरी पोलिस अधिक्षक मोहेश्वर रेड्डी यांनी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात केल्याने व पोलिसांची गस्त वाढविल्याने दारू माफियांच्या मनसुब्यावर पाणी फेरल्या जात आहे.


अशीच एक दारू माफियांची कवायद फसली असून पडोली पोलिसांच्या सतर्कतेने जवळपास ४०० पेक्षा जास्त दारूच्या पेट्या भरलेला ट्रक पकडल्या गेला आहे. विशेष म्हणजे ऐन पडोली हद्दीत हा ट्रक फेल झाल्याने मोठ्या प्रमाणात दारू साठ पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. या ट्रक मधे ४२० देशी दारूच्या पेट्या पकडल्या गेल्या असून याची किमत ४२ लाख रुपये सांगण्यात येत आहे. ही कारवाई काल रात्री २,०० वाजता करण्यात आली असून युसूफ अन्सारी नावाच्या ड्रायव्हरला अटक करण्यात आली आहे.

या संदर्भात उपविभागीय पोलिस अधिकारी नांदेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक गाईबोले यांनी तपासाची सूत्रे हाती घेऊन कारवाई सुरू केली आहे.