चिमूर तालुक्यात मुलीच्या मैत्रिणीवर वाडिलाने केला बलात्कार ! अल्पवयीन 4 महिने पोटुशी -दिवसेंदिवस वाढती विकृती #POCSO - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

चिमूर तालुक्यात मुलीच्या मैत्रिणीवर वाडिलाने केला बलात्कार ! अल्पवयीन 4 महिने पोटुशी -दिवसेंदिवस वाढती विकृती #POCSO

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : चिमूर -
मुलीच्या मैत्रिणीवर बलात्कार करणाऱ्या एका नराधमाला  अटक करण्यात आली आहे.  गंभीर बाब म्हणजे ही अल्पवयीन मुलगी चार महिन्यांची गर्भवती आहे. घटना चंद्रपूरमधील चिमूर तालुक्यातील वहानगाव येथील आहे.गावातीलच योगेश दोहतरे नामक आरोपीच्या घरी त्याच्या मुलीची १२ वर्षीय मैत्रीण यायची. तिच्यावर योगेशची नजर होती. ती घरी आली की, तो तिच्याशी लगट करायचा आणि कुठं वाच्यता केली, तर जीवानिशी ठार मारण्याची धमकी द्यायचा. त्यामुळं मुलगी घाबरून सगळं सहन करायची. याचा फायदा उचलत त्यान तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. 

दोन दिवसांपूर्वी या मुलीचं पोट दुखत असल्यानं तिच्या आईनं डॉक्टरकडे नेलं आणि तपासात जे समोर आलं. त्यानं आई-वडिलांना धक्काच बसला. त्यानंतर हा सगळा प्रकार तिनं कथन केला. त्यावरून शेगाव पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली. तक्रारीवरून आरोपी योगेश दोहतरे याच्याविरुद्ध पॉक्सो, ३७६ कलमाखाली गुन्हा दाखल करून रविवारी त्याला अटक करण्यात आली.