चंद्रपूर ब्रेकिंग : चंद्रपुरात 4 कोरोना संशयित रुग्णांवर उपचार सुरू : कोणताही धोका नाही - नागरिकांनी भयभीत होण्याचे कारण नाही - डॉ. निवृत्ती राठोड #corona effect - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

चंद्रपूर ब्रेकिंग : चंद्रपुरात 4 कोरोना संशयित रुग्णांवर उपचार सुरू : कोणताही धोका नाही - नागरिकांनी भयभीत होण्याचे कारण नाही - डॉ. निवृत्ती राठोड #corona effect

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :

जगभरात कोरोना ने हाहाकार माजवला असून आता भारतात देखील हा कोरोना पाय पसरु लागला आहे.

महाराष्ट्रातही दररोज कोरोनाच्या संशयित रुग्णाची संख्या वाढू लागली असून चंद्रपूरातील सिंदेवाही तालुक्यातील एका गावातील एकाच परिवारातील तीन लोकांना चंद्रपूर येथील रुग्णालयात रविवारी रात्री 1.30 वाजताच्या दरम्यान दाखल करण्यात आले आहे.यातील कुटुंब प्रमुख हे हज यात्रेवरुन परतले होते.त्यांना सर्दी खोकल्याचा त्रास जाणवत असल्यामुळे ते खाजगी रुग्णालयात गेले,मात्र डॉक्टरांनी त्यावर चंद्रपुरला जाण्याचा सल्ला दिला.शनिवारी रात्री चंद्रपुर येथील डॉक्टरांच्या चमुने 108 रुग्णवाहिकेतुन त्यांना त्यांच्या गावातुन चंद्रपुर येथे आणले. या एकाच परिवारातील तीन व्यक्तींचे तपासासाठी घेतलेले नमुने हे लॅबमध्ये पाठवण्यात आले असून त्याचा अहवाल रविवारी संध्याकाळपर्यंत प्राप्त होणार आहे. सध्या त्यांना डॉक्टरांच्या निगरानीत ठेवण्यात आलेले आहे.तर चंद्रपुर शहरातील एक व्यक्ती दुबईवरून परतला असल्याने त्याची देखील तपासणी करण्यासाठी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.या संशयित रुग्णाचा अहवाल देखील रविवारी संध्याकाळपर्यंत प्राप्त होणार असल्याची माहिती आहे,त्यामुळे चंद्रपूरकरांना सतर्क राहण्याची गरज भासू लागली आहे.