खळबळजनक ! : चंद्रपुरातील नामांकित कॉलेज चे प्राध्यापक विनोद भरटकर यांना अटक : 376, पॉस्को अट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल : विद्यार्थिनींची शहर पोलीस ठाणे येथे तक्रार #POCSO #atrocity - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

खळबळजनक ! : चंद्रपुरातील नामांकित कॉलेज चे प्राध्यापक विनोद भरटकर यांना अटक : 376, पॉस्को अट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल : विद्यार्थिनींची शहर पोलीस ठाणे येथे तक्रार #POCSO #atrocity

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : चंद्रपूर शहरातील  नामांकित   कॉलेज च्या  विनोद सखाराम भरटकर या क्रीडा प्रशिक्षक  प्राध्यापकाविरोधात केलेल्या तक्रारी वरून शहर पोलिस ठाणे  येथे विद्यार्थिनीच्या तक्रारीवरून कलम 376, पॉस्को व अट्रॉसिटी अक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.या घटनेने चंद्रपूर शहरातील शैक्षणिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे “तुला करियर करायचं असेल तर माझ्यासोबत शारीरिक सबंध ठेव” अशा प्रकारची धमकी विनोद भरटकर यांनी देवून तब्बल चार वर्ष आपल्याच प्रशिक्षणामधे प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीचे शारीरिक शोषण केले असल्याची बाब आता उघड झाली आहे. 

या बाबत शहर पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक बहादूरे यांनी संपूर्ण माहिती घेवून शेवटी आरोपी विनोद भरटकर यांना काल (14 मार्च )रात्रीच अटक केली. 


या संदर्भात उपविभागीय पोलिस अधिकारी नांदेडकर यांनी अधिकृत माहिती प्रसारमाध्यमांना दिली आहे.