पाहा : 31 मार्च 2020: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लाईव्ह #CMLIVE - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

पाहा : 31 मार्च 2020: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लाईव्ह #CMLIVE

Share This
 • एकच मंत्र, गर्दी करु नका, आपण या युद्धात जिंकणारच : मुख्यमंत्री Uddhav Thackeray
 • मला Raj Thackeray, शरद पवार, अजित पवार, जयंत पाटील, गृहमंत्री अनिल देशमुख, आरोग्यमंत्री राजेश टोपे 
 • सहकार्य करत आहेत ... तुम्ही घरातच थांबा , आम्ही तुमच्यासाठी झटत आहोत ... !!
खबरकट्टा / महाराष्ट्र : ताज्या बातम्या - 

लोकप्रतिनिधी आणि शासकीय कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात केला जाणार असल्याची चर्चा आज दिवसभर सुरू होती. मात्र अशा प्रकारे कोणतीही कपात केली जाणार नसल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं. आज सकाळपासून अनेकांचे फोन आले. कित्येकांनी काळजी व्यक्ती केली.

मात्र सरकार कोणाचंही वेतन कापणार नाही. सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन आलेल्या आर्थिक अडचणी पाहता लोकप्रतिनिधी आणि शासकीय कर्मचाऱ्यांना टप्प्याटप्प्यात पगार दिला जाईल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी राज्यातल्या जनतेशी संवाद साधला.

कोरोनाचं संकट असतानाही शासकीय कर्मचारी सेवा देत आहेत. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्याचं काम सुरू आहे. वैद्यकीय कर्मचारी अहोरात्र राबत आहेत. पोलीस आपल्या संरक्षणासाठी कार्यरत आहेत. जनतेच्या सेवेसाठी अखंडपणे कार्यरत असलेल्या मंडळींचा पगार कापण्याचा प्रश्नच येत नाही. मात्र सध्याची आर्थिक परिस्थिती पाहता तो टप्प्याटप्प्यात देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

आपण कोरोनाविरुद्धच्या लढाईच्या अखेरच्या आणि निर्णायक टप्प्याकडे जात आहोत. त्यामुळे वस्त्या, इमारती सील कराव्या लागत आहेत. एखाद्या भागातला संसर्ग दुसरीकडे पोहोचू नये यासाठी ही काळजी घेतली जात आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. सुरुवातीला केंद्र सरकारनं काही देशांचा समावेश कोरोनाग्रस्त देशांच्या यादीत केला नव्हता. त्यामुळे अशा देशांमधून आलेल्या व्यक्तींची तपासणी होऊ शकली नाही. परदेशातून आलेल्या, मात्र तपासणी न झालेल्या अशा व्यक्तींनी पुढे यावं, स्वत:ची माहिती द्यावी आणि तपासणी करून घ्यावी, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. 

कोणाच्याही वेतनात कपात केलेली नाही. फक्त काही टप्प्यात विभागणी केलेली आहे. अत्यावश्यक सेवांमध्ये काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचे वेत कपात केलेलं नाही. कुणाचंही वेतन कपात केलेली नाही. थोडीशी घडी नीट बसवण्यासाठी आपण मांडणी करत आहोत. सर्वांनी सहकार्य करावं,” असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

रेशनबद्दल केंद्र सरकारकडून सूचना आले आहेत. राज्य सरकारकडूनही वाटप होणार नाही. जीवनाश्यक वस्तूंचा तुटवडा होऊ देणार नाही. तेवढा साठा आहे,” असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

“शिवभोजन थाळी आता पाच रुपयात केली आहे. शिवभोजन थाळ्यांची संख्या 25 हजारांपर्यंत गेली आहे. मी 1 लाखांपर्यंत परवानगी दिली आहे. त्याही पलीकडे जायचं झालं तर तेही करु. पण अनावश्यक गर्दी करु नये. शिवभोजन केंद्रातही अनावश्यक गर्दी करु नये. हळूहळू शिस्त येत आहे. मात्र, ती शिस्त पूर्णपणे आली पाहिजे. भाजी मार्केटमध्ये अंतर ठेऊन उभं राहावं. सगळं व्यवस्थित होत आहे,” असेही मुख्यमंत्री म्हणाले.