तपासणी करण्याचे टाळून ट्रॅव्हल्सधारकाने सोडले चंद्रपुरात पुण्याचे 300 प्रवाशी-विद्यार्थ्यांचा समावेश -होम कॉर्नटाईन चे शिक्के न मारताच पुण्याहून आलेल्याचा चंद्रपुरात प्रवेश ; -नागरिकांमध्ये संताप #COVID-19 #QUARANTINE - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

तपासणी करण्याचे टाळून ट्रॅव्हल्सधारकाने सोडले चंद्रपुरात पुण्याचे 300 प्रवाशी-विद्यार्थ्यांचा समावेश -होम कॉर्नटाईन चे शिक्के न मारताच पुण्याहून आलेल्याचा चंद्रपुरात प्रवेश ; -नागरिकांमध्ये संताप #COVID-19 #QUARANTINE

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :एकीकडे रेल्वेने चंद्रपुरात येत असलेल्या सर्व प्रवाश्यांची रेल्वे स्थानकावरच वैद्यकीय तपासणी करण्यात येऊन त्यांना होम कारांटाईन चे शिक्के मारून शहरात घरी सोडण्यात येत असताना दुसरीकडे पुण्यावरून प्रवाशी घेऊन आलेल्या पर्पल नामक ट्रॅव्हल्स धारकाने बस क्रमांक  MH-14-HU-1140 प्रसन्ना पर्पल मधील  प्रवाश्यांची माहिती प्रशासनाला न देता वैद्यकीय तपासणी न करता प्रवाश्याना थेट चंद्रपूर शहरातील वेगवेगळ्या स्टॉप वर सोडल्याने आता चांद्रपूरकरांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे .


आज संपूर्ण चंद्रपूर शहरात जनता  लागू होते , रस्ते निर्मनुष्य होते त्या दरम्यान हा प्रकार घडला आहे . वाहतूक पोलिसांनी या प्रवाश्याना अडवून रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला मात्र हे प्रवाशी पोलिसांचे न ऐकता विना तपासणी थेट आपापल्या घराकडे रवाना झाले .


या संदर्भात जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधिशकांकडे तक्रार झाल्यानंतर यंत्रणा हालचाली करीत आता ट्रॅव्हल्स मालकाकडून प्रवाश्यांची नावाची यादी मागून त्या प्रवाश्यांची शोध मोहोम सुरू करण्यात आली आहे.