अत्यंत महत्वाची जाहीर सूचना : दोन किंवा दोन पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास बंदी : आदेशान्वे जिल्हाधीकारी :23/03/2020 ते 31/03/2020 चे दरम्यान मनाई आदेश लागू #COVID-19 - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

अत्यंत महत्वाची जाहीर सूचना : दोन किंवा दोन पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास बंदी : आदेशान्वे जिल्हाधीकारी :23/03/2020 ते 31/03/2020 चे दरम्यान मनाई आदेश लागू #COVID-19

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : जाहीर सूचना -जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांचे 22 मार्च 2020 चे अत्यंत महत्वाचे आदेश पुढीलप्रमाणे -

महाराष्ट्र शासन, राजपत्र असाधारण भाग -1 मध्ये उपविभागीय यांचे कडील अधिसूचना क्रमांक 3 मधील पान क्र. 4 मधील फोजदारी दंड प्रक्रिया संहिता 1973 च्या क्र. एमएससी -1274/व्ही -एफ मधील आदेशाने फोजदारी दंडाधीकारी प्रक्रिया संहिता 1973(1974 चे 2) चे कलम 21 अन्व्ये जिल्हादंडाधीकारी,चंद्रपूर यांना विषेश कार्यकारी दंडाधीकारी म्हणून नियुक्त करून कलम 144 चे विषेश अधिकार प्रदान केले असल्याने जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी  दिनांक 23/03/2020  ते 31/03/2020 चे दरम्यान मनाई आदेश लागू केले आहेत.◾️असे कुठलेही कार्यक्रम ज्यात दोन पेक्षा जास्त लोक सहभागी असतिल अशा सर्व कार्यक्रम, प्रशिक्षण ह्यावर बंदी घालण्यात आली असुन कोरोना विषाणूच्या संसर्गावर आळा घालण्यासाठी सदर निर्णय घेण्यात आलेला आहे हे विशेष. 

◾️अन्वये 2 किंवा 2 पेक्षा जास्त व्यक्तींना कोणत्याही खाजगी किंवा सार्वजनिक ठिकाणी,कार्यक्रम, समारंभ, सांस्कृतिक कार्यक्रम, सण, उत्सव, उरूस, जत्रा, मनोरंजनाचे कार्यक्रम, क्रीडा, स्पर्धा किंवा इतर कोणत्याही गर्दी होणाऱ्या निमित्याने एकत्र येता येणार नाही. 

◾️सर्व प्रकारचे कृत्य जसे कार्यशाळा, कॅम्प, प्रशिक्षण वर्ग, बैठक, मिरवणूक, मेळावे, सभा, आंदोलने, देशांतर्गत व परदेशातील सहली, इत्यांदींचे आयोजन करण्यास मनाई.

◾️सर्व दुकानें, सेवा आस्थापने, उपहारगृहे, खाद्यगृहे, खानावळ, शॉपिंग कॉम्प्लेक्स, सुपर मार्केट, मनोरंजनाची ठिकाणे, क्लब /पब, क्रिडांगणा मैदान, जलतरण तलाव, उद्याने, सिनेमागृहे, नाट्यगृहे, शाळा, महाविद्यालय, खाजगी शिकवणी वर्ग, व्यायामशाळा संग्रहालये बंद. 

◾️सर्व नागरिकांना अनावश्यकरित्या सार्वजनिक ठिकाणी विहित कारनाशिवाय येण्यास मनाई राहील.सदरचे आदेश खालील बाबतीत लागू होणार नाही.

◾️शासकीय /निमशासकीय कार्यालय, सरकारी महामंडळ उपक्रम, अत्यावश्यक सेवेतील व्यक्ती रुग्णालये, पॅथालॉजि, लॅबोरेटरी, दवाखाना, बँक, विमानतळ, पेट्रोल पंप  इत्यादी. 

◾️अंत्यविधी (कमाल 50 व्यक्तीपुरता मर्यादित ).

◾️सर्व हॉटेल मध्ये वास्तव्यास असलेल्या ग्राहकांना आरोग्यविषयक खबरदारी घेऊन रेस्टोरंट मध्ये खाद्यपदार्थ बनवून देण्यास परवानगी राहील. 

◾️अत्यावश्यक किराणा, दुग्ध, फळे व भाजीपाला, पार्सल स्वरूपात कॉउंटर तसेच इतर मार्गानी विक्री /वितरित करण्यास परवानगी राहील.

◾️घरपोच सेवा देणाऱ्या सेवा उदा. अमेझॉन, फ्लिपकार्ट, बिगबास्केट इत्यादी सुरु राहतील. 

◾️प्रसारमाध्यमांचे सर्व प्रकार चे दैनिक, नियततालके, टीव्ही न्यूज चॅनेल इ. सुरु राहील. 


सदरचा आदेश एकतर्फी काढण्यात आला असून याची माहितीमाननीय जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी जिल्ह्यामधे फौजदारी प्रक्रिया संहितेचे कलम 144 (1) (3) लागू केलेले असून  कुठलेही सदर कायद्याचा भंग केल्यास भारतीय दंड विधान कलम 188, 269, 270,  तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम 50, 52 अन्वये गुन्हा दाखल केला जाईल याची नोंद घ्यावी असे पोलीस विभागानेही कळवले असुन नागरिकांनी काटेकोरपणे ह्याचे पालन करावे अशी विनंती करण्यात आली आहे.