ब्रेकिंग : अख्या महाराष्ट्राला कुलूप : मा मुख्यमंत्री यांच्या “लाईव्ह” प्रसारणातील महत्वाचे मुद्दे : आज मध्यरात्रीपासून राज्यात 144 कलम लागू बघा लाइव्ह #COVID-19 #CMMaharashtra #udhhavthackeray #CORONA EFFECT #coronalockdown - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

ब्रेकिंग : अख्या महाराष्ट्राला कुलूप : मा मुख्यमंत्री यांच्या “लाईव्ह” प्रसारणातील महत्वाचे मुद्दे : आज मध्यरात्रीपासून राज्यात 144 कलम लागू बघा लाइव्ह #COVID-19 #CMMaharashtra #udhhavthackeray #CORONA EFFECT #coronalockdown

Share This
खबरकट्टा / महाराष्ट्र :



महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे आज दिनांक 22 मार्च च्या जनता कर्फ्यू व कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावावर मात करण्यासाठी खबरदारी घेत जनतेला संबोधित करताना.



मुख्यमंत्री सचिवालय (जनसंपर्क कक्ष) 
दि २२ मार्च २०२० 

मा मुख्यमंत्री यांच्या “लाईव्ह” प्रसारणातील महत्वाचे मुद्दे खालील प्रमाणे -


  • आज मध्यरात्रीपासून राज्यात 144 कलम लागू
  • आपण आता अधिक पुढची पावले टाकत आहोत. सर्वात कठीण काळ आता सुरु झालं आहे.
  • जी जिद्द आज आपण दाखविली आहे ती पुढे पण दाखवा. ही आपली खरी परीक्षा आहे. सरकार गंभीर आहे. आपणही सहकार्य करा. 
  • महाराष्ट्रातल्या सर्व नागरी भागात १४४ कलम लावण्यात येत आहे. ५ पेक्षा जास्त लोक एकत्र येऊ नका. 
  • रेल्वे, खासगी बसेस , एस टी बसेस बंद करीत आहोत.
  • जीवनावश्यक आणि अत्यावश्यक कारणांसाठीच शहरांतर्गत बस सेवा सुरु राहील 
  • अन्न धान्य, भाजीपाला, औषधे ही दुकाने सुरूच राहतील
  • बँका, वित्तीय संस्था सुरूच राहतील 
  • शासकीय कार्यालयात आता केवळ ५ टक्के कर्मचारीच उपस्थित राहतील.  
  • आज मध्यरात्रीपासून सर्व जगातून येणारी विमाने बंद करीत आहोत. 
  • ज्यांचे घरीच विलगीकरण केलेले आहेत त्यांच्या हातावर शिक्के आहेत. अशांनी कृपा करून १५ दिवस घराबाहेर पडू नका. आणि घरातल्या घरात सुद्धा वेगळे रहा. 
  • चाचणी केंद्रे आपण वाढवीत आहोत. 
  • ३१ मार्चच्या पुढे देखील गरज पडली तर निर्णय घेण्यात येईल.
  • सर्व प्रार्थनास्थळांवर पूजा अर्चा सुरु राहील पण भाविकांसाठी बंद. 
  • अमेरिकेतल्या ट्रम्पपासून ते आपल्याकडच्या सरपंचांपर्यंत सर्वांनी काळजी घ्यावी अशी परिस्थिती. 
  • पण माणुसकी बाळगा. कामगार-तात्पुरत्या आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन द्या.