सर्वात मोठी बातमी : संपूर्ण देशात 21 दिवसांसाठी लॉकडाऊन (एकप्रकारचा कर्फ्यू) : पंतप्रधान नरेंद्र मोदींचे देशाला आवाहन ##COVID-19 #NARENDRAMIDI - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

सर्वात मोठी बातमी : संपूर्ण देशात 21 दिवसांसाठी लॉकडाऊन (एकप्रकारचा कर्फ्यू) : पंतप्रधान नरेंद्र मोदींचे देशाला आवाहन ##COVID-19 #NARENDRAMIDI

Share This
खबरकट्टा / थोडक्यात -कोरोना विषाणूचा वाढता प्रचंड प्रादुर्भाव धोका ध्यानात घेत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिनांक 24मार्च  2020 च्या मध्यरात्री 12 वाजता पासून पुढील 21 दिवसांचा लॉकडाऊन म्हणजे सर्व व्यवहार बंद करण्यात येत असल्याची घोषणा केली असून देशातील नागरिकांना घरातच राहून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. 

WHO  च्या आकडेवारी नुसार कोरोना विषाणू संक्रमण 67 दिवसात 1 लक्ष लोकांना झाले त्यानंतर पुढच्या 11दिवसात पुन्हा 1 लक्ष लोकांना लागण झाली व नंतर फक्त 4 दिवसात पुढच्या 1 लक्ष लोकांना झपाट्याने लागण झाल्याचे समोर आले असून हे अतिशय भयंकर असल्याचे सांगत या संक्रमणाची साखळी आपल्याला तोडायची आहे. त्याची  खबरदारी घेत घरातच राहून स्वतःच स्वतः चे रक्षण करण्याचे व सोशल डिस्टंसिंग म्हणजे सामाजिक दुरावा प्रधानमंत्री पासून गावातील प्रेतेक नागरिकांनी पाळला पाहिजे. 

एक संक्रमित व्यक्ती शेकडो लोकांना लागण करू शकतो म्हणून कोरोना म्हणजे कोई रोड पर ना निकलो असा अर्थ लावत आपण  पुढचे तीन आठवडे कितीही अत्यावश्यक कार्य असले तरीही ते सोडून घरातच राहण्याचे आवाहन केले आहे.