महापुरुषांबद्दल अवमानास्पद भाष्य करणाऱ्यांचा निषेध ! कायदा हातात घेऊन अमानुष मारहाण करणाऱ्यां18 लोकांविरुद्ध विविध कलमान्वये वअट्रॉसिटी कायदा अंतर्गत गुन्हे दाखल : जिल्ह्यात जमावबंदी 144कलम लागू असतानाही उरले नाही कायद्याचे भय #Atrocity - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

महापुरुषांबद्दल अवमानास्पद भाष्य करणाऱ्यांचा निषेध ! कायदा हातात घेऊन अमानुष मारहाण करणाऱ्यां18 लोकांविरुद्ध विविध कलमान्वये वअट्रॉसिटी कायदा अंतर्गत गुन्हे दाखल : जिल्ह्यात जमावबंदी 144कलम लागू असतानाही उरले नाही कायद्याचे भय #Atrocity

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : 


मानवतावादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जितेंद्र राऊत हे काल स्वत:च्या शेतात असतांना चंद्रपूर जिल्ह्यातील काही युवकांनी त्यांच्या शेतात जाऊन लाथाबुक्क्यांनी,लाढ्यांनी बेदंम मारहाण केली व राऊत यांच्या  त्यांच्या पत्नीचा विनयभंग करीत,त्यांच्या मुलीला आणि मुलाला मारले असल्याची घटना घडल्याची तक्रार काल दिनांक 20 मार्च 2020 रोजी जितेंद्र राऊत व त्यांच्या पत्नीने सिंदेवाही पोलीस ठाण्यात दिली. 

महापुरुषांबद्दल अवमानास्पद भाष्य केल्याच्या आरोपावरून मारहाण करणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या 18 लोकांवर  सौ.वनीता राऊत यांच्या तक्रारीवरून भारतीय दंड संहिता १८६० अन्वये भांदवी ३२४,४४७,१४३,१४७,१४९, गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तद्वतच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम १९८९ अन्वये भांदवी ३(१)(आर.)३(१)(एस.),३(२)(व्हिए.)३(१(डी.),३(१)(अ), अंतर्गत सुध्दा गुन्हा दाखल झाला आहे.याचबरोबर महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ अन्वये भांदवी १३५ अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.बाबत सविस्तर वृत्त असे की, जिल्ह्यात जमावबंदीचे 144 कलम लागू करण्यात आले आहे. यानंतर कुठेही पाच अथवा त्याहून जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.अश्या स्थितीत पन्नास साठ लोकांचा एक घोळका सिंदेवाहीचा मार्गावर दिसतो. एका इसमाचा गळ्यात चप्पलाची माळ टाकली जाते.त्याचा तोंडावर काळे फासले जाते अन त्याची मुख्य मार्गावरुन धिंड काढली जाते. हा  प्रकार बघून चंद्रपूरात कायदा जिवंत आहे काय ?असा प्रश्न काल संपूर्ण राज्यभर चर्चिला जात होता. 

सिंदेवाही येथिल एका इसमाने " शिवाजी भक्तांसाठी पुन्हा एक निवेदन " नावाचा विडीओ तयार केला अन यूट्यूब वर टाकला.हा विडीओ 2018 मध्ये अपलोड केला गेला आहे.  साधारणता हा विडीओ चार ते पाच हजार लोकांनी बघीतला आहे. तब्बल दोन वर्षानंतर हा विडीओ चर्चेत आला अन चंद्रपूरातील काही लोकांची नजर गेली. त्यांच्या संताप अनावर झाला. यानंतर थेट या लोकांनी   सिंदेवाही गाठली. जवळपास पन्नास ते साठ युवकांनी त्या इसमाला घेरा घातला. त्याचा गळ्यात चप्पलांची माळा घातली. तोंडावर काळा रंग फासला अन चोपही दिला. चप्पलांचा हार गळ्यात टाकून त्या व्यक्तीला मुख्य मार्गाने फिरविल्या गेलं.बरं हा प्रकार घडला कधी ? जिल्ह्यात  जमावबंदीचे 144 कलम लागु असतांना. कुठेही पाच अथवा त्याहून जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास प्रतिबंध असतांना घडलेल्या या प्रकाराने जिल्ह्यात कायदा जिवंत आहे कि नाही ? यावरच प्रश्न उपस्थित केला गेला.

न्याय देणाऱ्या प्रभावी संस्था आपल्या देश्यात कार्यरत आहेत. आणि त्या संस्था आपले कार्य प्रामाणिकपणे पार पाडित आहेत. त्यांचावर विश्वास न ठेवता आपणच आपल्या डोक्यात येईल तसा न्यायनिर्वाळा करणे हे सामाजिक स्वास्थ बिघडविण्यासाठी उचलले अघोरी पाऊल ठरते. आपल्या भावना शुध्द आहेत. भावनांचा सन्मान आहे..! मात्र भावनेला कायद्यात  स्थान नसते याचा विसर झालेल्या डोक्यांनी कायदा हातात घेतला.भावना आणि कायदा या दोन वेगवेगळ्या बाबी आहेत. यांच " मिसळ " होवू शकत नाही. भावनेचा आहारी जावून आपणच न्यायनिर्वाळा करित सूटलो तर कायद्यांची गरज उरणार नाही.


आपल्या आदर्शाना कुणी वाईट बोललं तर संताप अनावर होतो.व्हायला ही हवा . मात्र संताप व्यक्त करतांना आपल्या हातून कायद्या सूव्यवस्थेचा भंग होणार नाही,याची काळजी ही घ्यायला हवी. एखाद्या विचाराचा , व्यक्तीचा अथवा शासनाचा विरोध करण्यासाठी संविधानिक मार्ग आहेत. मात्र कायदेशिर मार्गांना बाजूला सारुन बेकायदेशीर मार्गाने आपले मत व्यक्त होत असेल तर कायद्याचा नजरेत आपणच गुन्हेगार ठरतो. अश्या व्यक्तींना इतरावर बोट उचलण्याचा अधिकार नसतो.

वास्तविकता जितेंद्र राऊत यांचे फेसबुकवर आक्षेपार्ह लिखाण असेल तर महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही पोलिस स्टेशन मध्ये या युवकांनी ,त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करणे आवश्यक होते.

परंतू असे न करता चंद्रपुरातील काही लोकांनी सिंदेवाही तालुक्यातील मौजा पेंढरी(कोकेवाडा) येथे आले व मौजा पेंढीरी अंतर्गत असलेल्या जितेंद्र राऊत यांच्या शेतात गेले आणि त्यांना बेदम मारहाण करणे सुरु करून त्यांच्याच मोबाईल वरून हे सर्व कृत्य सोशल मीडिया वर लाइव्ह टाकून त्यांच्याकडून या मारहाणी बद्दल कोणतीही तक्रार नसल्याचे दुपारी लिहून घेतले.


जितेंद्र राऊत यांना या लोकांनी बळजबरीने स्वत:च्या चारचाकी वाहनात बसवून सिंदेवाही येथे नेले व त्यांच्या गळ्यात चपलांचा हार टाकून व त्यांच्या तोंडाला काळे फासून त्यांची धिंड काढली.हा एक प्रकारे कायद्याच्या वर जाऊन अमानवीय कृत्यातंर्गत बेकायदेशीर बेजबाबदार पणाचे कृत्य असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया जिल्हाभर उमटल्या. या प्रकरणात काहीनी जागरुकता दाखविली. त्यांनी विडीओ अपलोड करणाऱ्या कार्यवाही करा,अश्या मागणीचे निवेदन पोलीसांना दिले. कायदेशीर मार्गाने त्यांनी आपला संताप व्यक्त केला महापुरुषांबद्दल महापुरुषांबद्दल अवमानास्पद भाष्य केल्याचा तीव्र निषेध व्यक्त करीत कायदा हातात घेणाऱ्यांचाही निषेध व्यक्त केला आहे. कायद्यावर विश्वास असला तर गुन्हेगार व्यक्तीवर अंकुश लावणे कठीण कार्य नाही,याची जाणीव सर्वांना असणे आवश्यक आहे.मात्र,कालच्या गंभीर घटनाक्रमाला अनुसरून,जितेंद्र राऊत यांच्या सौभाग्यवती सौ. वनीता जितेंद्र राऊत यांनी पोलिस स्टेशन सिंदेवाही मध्ये रात्रो 09 : 34 वाजता तक्रार दाखल केली व 18 लोकांविरुद्ध विविध कलमान्वये व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम (अट्रॉसिटी कायदा ) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आल्याने जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.