राजुरा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे 16 मार्च ला नवनियुक्त जिल्हाअध्यक्ष व नगरसेवकांचा सत्कार : सर्व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन ! #NCP - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

राजुरा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे 16 मार्च ला नवनियुक्त जिल्हाअध्यक्ष व नगरसेवकांचा सत्कार : सर्व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन ! #NCP

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : राजुरा -

राजुरा शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे दिनांक 16 मार्च 2020 सोमवार ला सकाळी 11वाजता चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष श्री राजेंद्र वैद्य व नुकत्याच पार पडलेल्या गडचांदूर नागरपरिषदेतील नवनियुक्त नगरसेवक यांच्या सत्कार सोहळ्याचे अजोजन करण्यात आले आहे. 

या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा अध्यक्ष श्री राजेंद्र वैद्य येणार असून प्रमुख पाहुणे म्हणून श्री. अरुण निमजे, श्री. नितीन भटारकार, सौ. बेबीताई उईके, श्री. मेहमूदभाई मुसा,श्री शरद जोगी यांची उपस्थिती राहील असे राजुरा शहर व तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे श्री संतोष देरकर यांनी कळविले असून तालुक्यातील सर्व नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. 

कार्यक्रमाचे स्थळ :
 "स्वयंवर मंगल कार्यालय "
संविधान चौक, गडचांदूर रोड, राजुरा 
दिनांक : 16/03/2020
वेळ : सकाळी 11 वाजता