वायरल विडिओ वास्तव : मुनगंटीवार यांच्या घरासमोर भाजपा पदाधिकाऱ्यांनी केले धारा 144 चे उल्लंघन : जाणून घ्या खरी वास्तविकता #SUDHIRMUNGANTIWAR #COVID-19 - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

वायरल विडिओ वास्तव : मुनगंटीवार यांच्या घरासमोर भाजपा पदाधिकाऱ्यांनी केले धारा 144 चे उल्लंघन : जाणून घ्या खरी वास्तविकता #SUDHIRMUNGANTIWAR #COVID-19

Share This
मुनगंटीवार यांच्या घरासमोर भाजपा पदाधिकारी एकत्र आहे,असा व्हिडियो वायरल होतांना दिसत आहे. अनेकांनी एकत्र येत त्यात  धारा 144 याचे उल्लंघन केले हे या व्हिडिओतुन सांगण्यात येत आहे.
खबरकट्टा / चंद्रपूर : 26 मार्च 2020- 


पण वास्तविकता काय आहे हे आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता वेगळेच चित्र समोर आले

आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी 300 पोलीस बांधवाना जेवणाची व्यवस्था केली आहे,सदर भाजपा पदाधिकारी हे जेवणाचे डब्बे पोलीस बांधवाना पोहचवण्याकरिता आलेले आहे. तसे त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडून रीतसर परवानगी घेत पासेस काढलेले आहे.

आज सगळीकडे दहशतिचे वातावरण आहे,सर्व सेवा कर्मचारी स्वतः चा जीव जोखीममध्ये टाकून पोलीस जनतेची सेवा करत आहे. वणवण फिरणारे पोलीस त्याना जेवणाची भ्रांत नाही अश्या परिस्थितीत आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी 300 पोलीस बांधवाना, तसेच 250 सामान्य रुग्णालयातील रुग्णाला वेळेवर जेवण मिळावे या उद्देशाने त्यांच्या जेवणाची व्यवस्था केली आहे.

या संपूर्ण मदतकार्य  व्यवस्थेचा कार्यभार असलेले काही पदाधिकारी काल मदतीसाठी लागलेली सोय पुरवठा व आढावा देण्याकरिता काल मुनगंटीवार यांच्या कार्यालयात गेले असताना बाहेर निघून चर्चा करताना ची ही घटना असल्याचे वास्तव समोर आले आहे.

एकीकडे संपूर्ण जिल्ह्यात लोकप्रतिनिधिंनी  अनेक कार्यकर्त्यांना मदतकार्य करण्याचे प्रोत्साहन दिले असून  त्यांच्या या निर्णयाचे स्वागत सर्वत्र होताना दिसते तर दुसरीकडे काही लोक मुद्दाम घरी बसल्या बसल्या खोड्या करताना आढळत असून हा विडिओ सुद्धा अश्याच प्रकारातून बनविण्यात आला असल्याचे पडताळणीत आढळून आले आहे. 


असल्याप्रकारामुळे चंद्रपुरातील जनता अश्या व्हिडियो काढणाऱ्या व्यक्तीवर संताप व्यक्त करत, ही वेळ  टीकाटिप्पणी करून वाया घालवण्यापेक्षा समाजकार्यात मदत करावी अश्या अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.