ब्रेकिंग : कोरोना छापा -विदेशातून आलेले 11 व्यक्ती ताब्यात : विनतपासणी धार्मिक स्थळी होते लपून : प्रशासनाने धरून टाकले वन अकादमी येथील विलगीकरणात : प्रशासनाला सहकार्य करा - कोरोना धोका टाळा #COVID-19 - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

ब्रेकिंग : कोरोना छापा -विदेशातून आलेले 11 व्यक्ती ताब्यात : विनतपासणी धार्मिक स्थळी होते लपून : प्रशासनाने धरून टाकले वन अकादमी येथील विलगीकरणात : प्रशासनाला सहकार्य करा - कोरोना धोका टाळा #COVID-19

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : 25 मार्च 2020-

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पसरू नये म्हणून सोशल डिस्टंसिन्ग राबविल्या जात असून बाहेरून आलेल्या प्रत्येक व्यक्तीला योग्य तपासणी करूनच 14 दिवस होम क्वॉरेंटाइन राहण्याचे सक्त आदेश आहेत. खबरदारी म्हणून विदेश, तसेच दुसऱ्या राज्यातून आलेल्यांनी प्रशासनाला स्वत: माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. असले तरीही काही लोकं धार्मिक ठिकाणाचा आसरा घेत चंद्रपुरात लपून असल्याची माहिती आज प्रशासनाला मिळताच एकच खळबळ उडाली होती असे खात्रीलायक वृत्त आहे. 

अधिक माहितीनुसार तुर्कीस्तान येथून 11, दिल्ली, ओडिसा आणि केरळ येथून आलेले प्रत्येकी 1 अशा एकूण 14 व्यक्ती तुकूम परिसरातील एका मशिदीमध्ये असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी आज दिनांक 25 मार्च बुधवार ला दुपारी छापा टाकला असता माहितीतील विदेशातून आलेले काही नागरिक तेथे आढळल्याने त्यांचे व्हीसा जप्त करत तात्काळ कार्यवाहीने  या  विदेशातून आलेल्या 11 व्यक्तींना  ताब्यात घेऊन तपासणीकरिता त्यांचे नमुने घेऊन विलगीकरणात पाठविण्यात आले व इतर तिघांनाही होम क्वॉरेटाइन पाळण्याचे बजाविण्यात आले आहे. हे विदेशी नागरिक 3 मार्च पासूनच येथे वास्तव्यास असून या धार्मिक स्थळाच्या प्रामुखाने प्रशासनापासून माहिती लपऊन ठेवल्याने या प्रकरणाची अधिक चौकशी होण्याची शक्यता आहे. या सर्व व्यक्तींना चंद्रपूर शहरातील मूल रोड वरील वन अकादमीच्या हॉस्टेल मध्ये स्वतंत्र खोलीत होम क्वॉरेंटाइनमध्ये ठेवण्यात आले आहे. देशात कोरोनाबाधितांची संख्या दररोज वाढत असून त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला. 

सर्व राज्य व जिल्हा सीमा सुद्धा 21 दिवसांकरिता बंद करण्यात आल्या असून परदेशातून, तसेच दुसऱ्या राज्यातून आलेल्या नागरिकांनी स्वत: पुढाकार घेऊन प्रशासनाकडे नोंद करावी आणि होम क्वॉरेटाइनमध्ये राहावे, अशा सूचना जिल्हा प्रशासनाकडून वारंवार देण्यात येत आहेत तरीही दोन दिवसांपूर्वी वडगाव येथून 2 व आज तुकूम येथून 11बाहेरून आलेल्या व्यक्तींना प्रशासनाला हुडकत जाऊन ताब्यात घ्यावे लागले हे धोकादायक आहे.