झेप व्यसनमुक्ती केंद्रातील गायब व्यक्तीचा मृतदेह विहिरीत सापडला :व्यसनाच्या आहारी गेलेला जगदीश 11मार्च रात्री झाला होता अचानक बेपत्ता - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

झेप व्यसनमुक्ती केंद्रातील गायब व्यक्तीचा मृतदेह विहिरीत सापडला :व्यसनाच्या आहारी गेलेला जगदीश 11मार्च रात्री झाला होता अचानक बेपत्ता

Share This
खबरकट्टा / गोंदिया :अर्जुनी मोरगाव : नवेगावबांध दिं.15.  मार्च येथील माऊली मोहल्ल्यातील रहिवासी जगदीश गोपाळा डोंगरवार (वय 40 वर्षे) यांचा मृतदेह एका विहिरीत सापडल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे.मृतक जगदीश हा 11 मार्चपासून चंद्रपुरातून बेपत्ता झाला होता.येथील  माऊली मोहल्ल्यातील रहिवासी जगदीश गोपाळा डोंगरवार हे दारूच्या व्यसनाच्या आहारी गेला होता. त्यामुळे त्यांच्यावर चंद्रपूर येथील झेप व्यसनमुक्ती केंद्रात उपचार सुरु होते.गेल्या महिन्याभरापासून तो या केंद्रात उपचार घेत होता.उपचार घेत असताना प्रसिद्ध महाकाली मंदिराच्या परिसरातील एका भांड्यांच्या दुकानात तो कामही करायचा.नेहमीप्रमाणे 11 मार्चला सकाळी 10 वाजता जगदीश कामावर गेला.परंतु नेहमीच्या वेळेवर तो व्यसनमुक्ती केंद्रात रात्री पोहोचला नाही.तेव्हा झेप व्यसनमुक्ती केंद्राच्यावतीने नवेगावबांध येथील त्यांच्या कुटुंबियांना 12 मार्चला जगदीश बेपत्ता असल्याचे कळविण्यात आले.

जगदीश हा घरी मात्र परतलाच नाही.तेव्हा कुटुंबीयांनी त्याचा इकडे तिकडे शोध घेतला.परंतु त्याचा कुठेही पत्ता काही लागला नाही.मृतक जगदीशची पत्नी केशर जगदीश डोंगरवार हिने वडिलांसोबत चंद्रपूरला जाऊन शनिवार 14 मार्चला शहर पोलीस स्टेशन चंद्रपूर येथे जगदीश बेपत्ता झाल्याची तक्रार  नोंदविली.आणि नवेगावबांधला 14 मार्चलाच रात्री घरी परतल्या.

आज 15 मार्च रोजी रविवारला माऊली मोहल्ल्यातील एक महिला पाणी भरण्यासाठी सकाळी 6.00 ते 6.30 वाजेच्या सुमारास विहिरीवर गेली असता विहिरीत एक मृतदेह तरंगत असल्याचे दिसताच तिने शेजार्यांंना माहिती दिली.तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष महादेव बोरकर यांनी पोलीस स्टेशन नवेगावबांधला माहिती दिल्यानंतर हवालदार साईनाथ नाकाडे, दीपक कराड ,सुभाष कश्यप,राजीराम मेश्राम ,वाहन चालक सयाम, कश्यप यांनी घटनास्थळी दाखल होत पाहणी केली.तेथे उपस्थित नागरिकांच्या सहकार्याने विहिरीतून मृतदेह बाहेर काढण्यात आले.तेव्हा चंद्रपुरातुन  बेपत्ता झालेल्या जगदीश डोंगरवारचे मृतदेह असल्याची खात्री पटली.तेव्हा गावात एकच खळबळ उडाली.पोलिसांनी मृतदेह ग्रामीण रुग्णालयात  उत्तरीय तपासणीसाठी पाठविले. बुधवारला सायंकाळी मृतक जगदीशला सौंदड येथे काही लोकांनी पाहील्याचे समजते. तसेच गुरुवारला देवलगाव रेल्वे स्टेशनवर  जगदीशला काहींनी पाहिल्याचे सांगितले जाते.

परंतु जगदीश या दोन्ही दिवशी घरी मात्र आला नाही असे पत्नी केशर व शेजारी महिलांनी देखील सांगितले. मृतक जगदीशचे आई वडील व मुले लग्नानिमित्ताने बाहेर गावी गेल्याने पत्नी केशर या एकट्याच घरी होत्या.मृतकची पत्नी केशरच्या तक्रारीवरून नवेगावबांध पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची (मर्ग) नोंद केली आहे. जगदीश ने आत्महत्या केली की काय? हा प्रश्न मात्र अनुत्तरित आहे.नवेगावबांध पोलिस स्टेशनचे ठाणेदार दिनकर ठोसरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार साईनाथ नाकाडे पुढील तपास करीत आहेत.
मृतक जगदीश डोंगरवारचे वडील गोपाळा डोंगरवार हे येथील श्रीकृष्ण प्रासादिक नाट्य मंडळाचे व्यवस्थापक होते. बालपणापासूनच वडिलांच्या नाटकाशी असलेल्या संबंधामुळे जगदीशलाही नाटकाचे वेड लागले. नाटकाच्या आयोजनात त्याचा सिंहाचा वाटा असे. अनेक  नाट्यप्रयोगाचे त्यांनी आयोजन केले होते. त्याच्या नाट्य प्रेमासाठी जगदीश नवेगावबांध वासियांच्या  नेहमीच लक्षात राहील.