दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू : 10विच्या परीक्षार्थी मित्राला आणण्यासाठी जात असताना अज्ञात वाहनाची जबर धडक - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू : 10विच्या परीक्षार्थी मित्राला आणण्यासाठी जात असताना अज्ञात वाहनाची जबर धडक

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : 

दहावीचा पेपर सुटल्यावर  परीक्षार्थी मित्राला घेण्यसाठी दुचाकीने गेलेल्या दोन मित्रांचा अज्ञात वाहनांच्या धडकेत जागीच मृत्यू झाला. हि घटना चंद्रपूर जवळ मूल रोडवर चिचपल्ली गावाजवळ आज दुपारी अंदाजे 2:30 वाजता घडली. अनिकेत प्रशांत सागोरे (18), व देवानंद सोयाम (19) अशी मृत विद्यार्थांची नावे आहेत.दहावीचा पेपर सुटल्याने अनिकेत व देवानंद हे दोघेही मित्राला घेण्यसाठी दुचाकीने चिचपल्लीच्या दिशेने जात होते. दरम्यान, अज्ञात वाहनाने चीचपल्लीजवळ दुचाकीला जबर धडक दिल्याने अनिकेत व देवानंद यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह उत्तरीत तपासणीसाठी पाठविले.