जिल्हा कोरोना नियंत्रण समितीमध्ये डॉ. प्रीती राजगोपाल व डॉ. स्वप्नील टेंबे यांची नियुक्ती : कोरोना संबंधात कोणतीही आकस्मिक उपाययोजना व मदत लागल्यास संपर्क - 📞07172- 253273 ; 07172 -262226 टोल फ्री - 104 #COVID-19 - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

जिल्हा कोरोना नियंत्रण समितीमध्ये डॉ. प्रीती राजगोपाल व डॉ. स्वप्नील टेंबे यांची नियुक्ती : कोरोना संबंधात कोणतीही आकस्मिक उपाययोजना व मदत लागल्यास संपर्क - 📞07172- 253273 ; 07172 -262226 टोल फ्री - 104 #COVID-19

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :
जिल्हा कोरोना नियंत्रण समितीमध्ये जिल्हा प्रशिक्षण पथक,आरोग्य विभाग, रामनगर चंद्रपूर येथे कार्यरत डॉ. प्रीती राजगोपाल व कोरपना तालुक्यातील नारंडा प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. स्वप्नील टेंबे यांची "संपर्क संवाद,आकस्मिक उपाययोजना व मदत पथकाच्या प्रमुख पदी"नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी, चंद्रपूर यांच्या आदेशान्वे करण्यात आली आहे. त्यांनी देण्यात आलेली जबाबदारी पुढीलप्रमाणे.. 

१.सर्व तालुका आरोग्य अधिका-यांशी दररोज दुरध्वनी द्वारे समन्वय साधून प्रत्येक तालुक्यातील स्थितीबाबत अदयावत माहिती घेणे.

२.सर्व तालुका आरोग्य अधिका-यांना प्राप्त नविन सूचनांबाबत अदयावत माहिती देणे.

३.भारत सरकार व महाराष्ट्र सरकार द्वारा निर्गमीत सुचनांची अमलबजावणी करणे,

४.देनदिन संशियीत /पांझोटीव रुग्ण, मृत्यूबाबत माहिती व विश्लेषण करणे.

५. तालुका आरोग्य अधिकारी, प्रतिबंधात्मक कृतीदल व जिल्हा सकेक्षण अधिकारी यांचेशी संपर्क साधुन आवश्यक सर्कक्षण, कार्यवाही बाबत खात्री करणे.

इत्यादी माहिती संकलनाचे कार्य डॉ. प्रीती राजगोपाल व डॉ. स्वप्नील टेंबे यांना देण्यात आले असून चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना संबंधात कोणतीही आकस्मिक उपाययोजना व मदत लागल्यास खालील क्रमांकावर तात्काळ संपर्क साधावा -📞07172- 253273 ; 07172 -262226 टोल फ्री - 104