जिल्हा परिषद शाळेचा स्लॅब कोसळला : विद्यार्थ्यी जीव मुठीत धरून ज्ञानार्जन करतात : शाळेची इमारत जीर्ण #zpchandrapur - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

जिल्हा परिषद शाळेचा स्लॅब कोसळला : विद्यार्थ्यी जीव मुठीत धरून ज्ञानार्जन करतात : शाळेची इमारत जीर्ण #zpchandrapur

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर  :हबीब शेख कोरपना -


कोरपना पंचायत समिती अतर्गत एकोडी येथील जिल्हा परिषद शाळेची जीर्ण इमारत धोकादायक बनली आहे. इमारत दुरुस्तीसाठी, शाळा व्यवस्थापन समितीने प्रस्ताव दिल्यानंतरही पंचायत समिती चे शिक्षण अधिकारी  आनंद धुर्वे याकडे  दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप येथील ग्रामस्थांनी केला आहे.तसेच जिल्हा परिषद चंद्रपूर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष  देवराव भोंगळे यांच्या कडे निवेदन देवून केराची टोपली दाखवली आहे असा आरोप ग्रामस्थ करित आहे.

एकोडी या गावात एक ते दोन वर्गापर्यंत जिल्हा परिषदेची शाळा आहे. या शाळेत सुमारे 28 च्यावर विद्यार्थी शिक्षण घेतात. येथे शिकविणीसाठी दोन शिक्षक आहेत. शाळेसाठी वीस वर्षांपूर्वी 2 खोल्या बांधण्यात आल्या होत्या.  दोन खोल्यांची अवस्था दयनीय आहे. तसेच विद्यार्थी - विद्यार्थिनींसाठी बांधण्यात आलेले स्वच्छतागृहाची दुरवस्था झाली असून पडझड झाली आहे. 

शाळेवरील दोन्ही खोल्यांवरील स्लँब खराब झाले असून भिंतींनाही मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत. शाळेच्या छतामधुन गिट्टी, रेती, विद्यार्थ्यांनच्या डोक्यावर व पुस्तकावर पडत असुन शाळेची इमारत कधी कोसळेल, याचा नेम नाही.
शाळेची इमारत धोकादायक बनल्याने विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून ज्ञानार्जन करावे लागत आहे. त्यामुळे एखादी दुर्दैवी घटना घडू नये याकरिता शाळा व्यवस्थापन समितीने  दुरुस्तीसाठी शिक्षण विभागाकडे प्रस्ताव सादर केला. परंतु याबाबत दखल घेण्यात आली नसुन शिवाय शाळा व्यवस्थापन समितीने पाठवलेल्या प्रस्तावावर विचार करण्यात आला नाही. परंतु शाळेची इमारत अत्यंत जीर्ण झाल्याने जिल्हा परिषद प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थांतून केली जात आहे.


मागील अनेक वर्षांपासून येथील शाळेच्या इमारतीचा प्रश्न मार्गी लागत नसल्यामुळे ग्रामस्थांतून संताप व्यक्त केला जात आहे. एकोडी येथील शाळेच्या इमारतीकडे शिक्षण विभागाने लक्ष देऊन बांधकामाच्या प्रस्तावाची दखल घेण्यात यावी, व येथील शाळेच्या इमारतीचा प्रश्न मार्गी लावण्यात यावा, अशी मागणी येथील विद्यार्थी व ग्रामस्त करित आहे.