आर्थिक उन्नतीसाठी शेतकर्‍यांनी पशुधनात क्रांती करणे काळाची गरज! - अध्यक्षा सौ. गुरनुले :मिंथुर येथे तालुकास्तरीय पशुपक्षीप्रदर्शनीचे उद्घाटन संपन्न #zpchabdrapur - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

आर्थिक उन्नतीसाठी शेतकर्‍यांनी पशुधनात क्रांती करणे काळाची गरज! - अध्यक्षा सौ. गुरनुले :मिंथुर येथे तालुकास्तरीय पशुपक्षीप्रदर्शनीचे उद्घाटन संपन्न #zpchabdrapur

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : नागभीड ( मंगळवार, दि. १८ फेब्रुवारी)नागभिड तालुक्यातील मिंथुर येथे पशुसंवर्धन विभाग पंचायत समिती नागभिड यांच्यावतीने आयोजित तालुकास्तरीय पशुपक्षीप्रदर्शनीचे उद्घाटन जि. प. अध्यक्षा सौ. संध्याताई गुरनुले यांच्या शुभहस्ते पार पडले. 

याप्रसंगी उपस्थित पशुपालकबंधूंना मार्गदर्शन करतांना, आपल्या आर्थिक उन्नतीसाठी शेतकरी बांधवांनी पशुधनात वाढ करणे काळाची गरज आहे. असे प्रतिपादन जि. प. अध्यक्षा सौ. संध्याताई गुरनुले यांनी केले. 

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मंचावर, जि. प. सदस्य संजयजी गजपूरे, सौ. प्रणयाताई गड्डमवार सभापती पं. स. नागभिड, सरपंच नंदकिशोरजी करकाडे, पं. स. सदस्य संतोषजी रडके, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सोमनाथे, संवर्ग विकास अधिकारी प्रणाली खेचरे, सुनीता गजपुरे, शर्मिलाताई रामटेके, दामोधरजी नवघरे, श्रीकृष्ण मेश्राम, पो.पा. सुरेश चौके, गभणे पशु अधिकारी पं. स. नागभिड तथा पशुसंवर्धन विभागाचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांसह शेतकरी, पशुपालकबंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते.