वणीच्या कलावंतांनी शेतकऱ्यांना दिले जीवन जगण्याचे तंत्र : बळीराजा चेतना अभियाना अंतर्गत जनजागृती #wani - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

वणीच्या कलावंतांनी शेतकऱ्यांना दिले जीवन जगण्याचे तंत्र : बळीराजा चेतना अभियाना अंतर्गत जनजागृती #wani

Share This
खबरकट्टा / यवतमाळ :भारत देश्याची कृषी प्रधान देश म्हणून ओळख आहे.संपूर्ण देशात शेतकऱ्यांची अवस्था बिकट होत असून आत्महत्या वाढत आहेत. शेतकरी जगला तर देश वाचेल , यासाठी सरकार च्या वतीने शेतकरी आत्महत्या थांबव्या म्हणून बळीराजा चेतना अभियान अंतर्गत शेयकर्यांनी आत्महत्या करू नये यासाठी कार्यक्रम सुरू केले आहे. 

वणी तालुक्यातील लाठी, तरोडा येथे सागर झेप बहुद्देशीय संस्थेच्या वतीने मनोरंजनात्मक माध्यमातून शेतकरी सक्षम व सुदृढ कसा होईल अशी जनजागृती करून शासनाच्या योजना शेतकऱ्यांना शेती साठी मिळणारे लाभ व आत्महत्या करण्यापेक्षा आपल्या कुटुंबाचा विचार करून उत्कृष्ट शेतकरी होऊन देशाची शान होऊ अशा पध्दतीने जनजागृती करण्यात आली.
    

ग्रामीण भागातील वास्तववादी जीवनाला अनुसरून नाटक सादर करण्यात आले ज्यामध्ये सागर मुने,आकाश महाडोळे,अविनाश शिवनीतवार,गजानन कोरंगे, मंगेश गोहोकर, शुभम उगले, तेजस्विनी तुराणकर, प्रांजली निमसरकर,ढोलक वर अक्षय करसे इत्यादी होते कलावंत होते.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लोकेश खोके यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रकाश चार्लीकर यांनी केले. लाठी येथील ग्रामपंचायत सदस्य राहुल खारकर व तरोडा येथील ग्रामपंचायत सदस्य सतीश वाराटे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.  या कार्यक्रमाला गावातील नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.