झाडे, झाडीया जमातीचे प्रश्न मार्गी लावणार- ना. विजय वडेट्टीवार #vijayvadettiwar - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

झाडे, झाडीया जमातीचे प्रश्न मार्गी लावणार- ना. विजय वडेट्टीवार #vijayvadettiwar

Share This
खबरकट्टा /महाराष्ट्र :


चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यातील झाडे, झाडीया जमातीचे प्रलंबित प्रश्न अधिवेशनापूर्वी मार्गी लावणार असे आश्वासन ना. विजय वडेट्टीवार यांनी झाडे-झाडीया समाजाच्या शिष्टमंडळास दिले.

चंद्रपूर जिल्ह्यात सावली तालुका व गडचिरोली जिल्ह्यात गडचिरोली, धानोरा, चामोर्शी, मुलचेरा, भामरागड, अहेरी, व सिरोंचा तालुक्यात झाडे जमात वास्तव्याने आहे. झाडे जमातीचे झाडे कुणबी, झाड्या कुणबी, झाडे कावु, झाडे कापेवार अशा नोंदी महसुली व इतर अभिलेखात नोंद आहे. अभिलेखानुसार एकाच व्यक्तींच्या दोन ते तीन जाती निर्माण झाल्या.या तफावती दुर करण्यासाठी चंद्रपूर-गडचिरोली संघर्ष समितीच्या मार्फतीने शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला. या तफावती दुर करण्यात याव्यात या करीता झाडे, झाडीया संघर्ष समितीच्या मार्फतीने ना. विजय वडेट्टीवार यांना निवेदन सादर करण्यात आले.यावेळी तुमचा प्रश्न अधिवेशनापूर्वी मार्गी लावणार असे आश्वासन ना.वडेट्टीवार यांनी दिले.

निवेदन देतांना माजी आ.डॉ. नामदेव उसेंडी, समितीचे उपाध्यक्ष वासुदेव तुंकलवार, सचिव पुरूषोत्तम अकविलवार, बी.डी. चौधरी, सखाराम दिवटीवार, रमेश तुंकलवार, प्रभाकर येलमुले, धनुजी मंटकवार उपस्थित होते.