यवतमाळ विधान परिषद पोटनिवडणुकीत शिवसेनेचे दुष्यंत चतुर्वेदी विजयी #vidhanparishad - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

यवतमाळ विधान परिषद पोटनिवडणुकीत शिवसेनेचे दुष्यंत चतुर्वेदी विजयी #vidhanparishad

Share This
खबरकट्टा / यवतमाळ :यवतमाळ येथील विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीमध्ये शिवसेना आणि महाविकासआघाडीचे उमेदवार दुष्यंत चतुर्वेदी यांचा विजय झाला आहे. मंगळवारी समोर आलेल्या निकालांमध्ये तर भाजपचे उमेदवार सुमित बाजोरिया यांना पराभवाचा धक्का बसला आहे. 

ताज्या आकडेवारीनुसार, शिवसेनेचे उमेदवार दुष्यंत चतुर्वेदी यांना पहिल्या फेरीत 298 मते पडली. तसेच त्यांना विजयी सुद्धा घोषित करण्यात आले. भाजपचे सुमित बाजोरिया यांना पहिल्या फेरीत 185 मते मिळाली होती. तर इतर 6 मते बाद ठरवण्यात आली आहेत. चतुर्वेदींचा विजय आधीच निश्चित असल्याचे समजून त्यांच्या समर्थकांनी जल्लोष साजरा केला.

चतुर्वेदींनी सहा महिन्यांपूर्वीच काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत शिवसेनेत प्रवेश केला होता. 

स्थानिक स्वराज्य संस्थेतून शिवसेनेचे तानाजी सावंत विधानपरिषदेचे सदस्य होते. ते उस्मानाबादमधून विधानसभेवर निवडून आले. त्यांच्या जागी माजी मंत्री सतिष चतुर्वेदी यांचे चिरंजीव दुष्यंत चतुर्वेदी यांना शिवसेनेने उमेदवारी दिली. यवतमाळ विधानपरिषद पोटनिवडणुकीसाठी शुक्रवार 31 जानेवारीला मतदान झाले. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र आल्यामुळे महाविकास आघाडीचाच उमेदवार विजयी होणार हे निश्चित मानले जात होते.