विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने वणीत रास्ता रोको व जेलभरो आंदोलन #vidarbha - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने वणीत रास्ता रोको व जेलभरो आंदोलन #vidarbha

Share This
खबरकट्टा / यवतमाळ :वणी -आज दि.10 जानेवारीला सकाळी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने वणीत रास्ता रोको व जेलभरो आंदोलन करण्यात आले.
      
शासन स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मितीचा निर्णय घेत नसल्यामुळे विदर्भातील जनतेमध्ये तीव्र रोष व्यक्त होत आहे. सरकार कडून गेली 60 वर्षांपासून विदर्भावर सातत्याने अन्याय होत आहे.शेतकरी आत्महत्या,कुपोषण, नक्षलवाद वीज महाग विदर्भातील युवकांच्या नौकऱ्या पळवणे असा अन्याय होत आहे त्यामुळे विदर्भ राज्य आंदोलन समिती कडून सन 2023 साठी विदर्भ मिशन अंतर्गत ऍक्शन प्लॅन तयार करण्यात आला आहे. याअंतर्गत आंदोलनाची रूपरेषा आखण्यात आली आहे.त्याचाच एक भाग म्हणुन आज रास्तारोको व जेलभरो आंदोलन करण्यात आले.


        
त्याचसोबत स्वतंत्र विदर्भ राज्याची त्वरित निर्मिती करा व विदर्भातील जनतेसाठी विजेचे दर निम्मे करा,वेगळा विदर्भ झालाच पाहिजे,लेके रहेंगे लेके रहेंगे विदर्भ राज्य लेके रहेंगे,विदर्भ के गद्दारो को जुते मारो सालो को अशा घोषना देत आज दि.10 फेब्रुवारीला वणी येथिल नागपूर रोड च्या पहिल्या टी पॉईंट शिरपूर बाय पास चौकामध्ये चक्का जांम आंदोलनात करण्यात आले. 

यावेळी नागपुर,घुग्गुस,वणी मार्गावर काही वेळापुरता चक्काजाम झाला होता.परंतु ठाणेदार वैभव जाधव यांनी पोलीसांचा चोक बंदोबस्त ठेवल्यामुळे हा रास्ता रोको फार काळ ठेवता आला नाही त्यामुळे हा रास्ता रोको शांततेत पार पडला. यावेळी विदर्भ राज्य आंदोलन समितीचे जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम पाटील,कोर कमिटी सदस्य रफिक रंगरेज,युवक जिल्हा अध्यक्ष राहुल खारकर,शेतकरी नेते देवराव धांडे,नारायण काकडे,संजय चिंचोळकर,बाळासाहेब राजूरकर दशरथ पाटील,होमदेव कनाके,विजयाताई आगबत्तलवार,राजु पिंपळकर,संजय चिंचोळकर,बालाजी काकडे,सृजन गौरकर,अमित उपाध्येय,मिलिंद पाटील,प्रियल पथाडे,दीपक नरवडे,अलका मोहोड,आनंदराव पानघाटे, अनिल गोवारदीपे,शरद खोंड,महादेव देऊलकर,दिगंबर पुनवटकर,सुरेखा वाडीचार यांचेसह महिला,पुरुष,युवक मोठ्यासंख्येने उपस्थित होते.