व्हॅलेंटाईन डे! #valentineday - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

व्हॅलेंटाईन डे! #valentineday

Share This
व्हॅलेंटाईन डे! 

पोरा कधी तरी गुलाब 
देऊनी बघ करपलेल्या हाती
जिच्यासाठी गुलाब घेऊनी जातोय 
आज ती तुझी अन् उद्या परक्याची... 

गुडघे भूमीवरी टेकूनी
प्रपोज कर रे जन्मदात्रीस
जिच्यापुढे तू गुडघे टेकीतोस 
ती फक्त आकर्षणाचा भास...

जन्मदात्रीने थापलेल्या भाकरीची चव
नाही रे त्या महागड्या चाॅकलेटात
मुखात घालुनी तिच्या चाॅकलेट
थांबवू नकोस रे यशाची वाटचाल...

चिमुकली तुझी लाडकी बहिण 
साध्या बाहूली साठी रोजच रडते
अन् तू त्या परक्या मुलीसाठी
पैसे साठवूनी महागडा टेडी घेऊनी जाते...

उकळता सूर्य पाठवरी घेणाऱ्या बापास
सुखाचे दिस दाखविण्या कर रे प्रॉमिस 
ज्या मुलीचा दुखःत नाही तुजला आधार
तिचा हात-हातात घेऊनी करितो सातजन्माचे प्रॉमिस...

लाडक्या तुझ्या बहिणीच्या गालाचा घे गोड मुक्का
अन् तिच्या साथीने कर अपुले सारी स्वप्ने साकार 
ज्या परकीचा घेतोस रे तू लाडाने-प्रेमाने मुक्का 
तिच करेल एके दिवशी तुझ्या अंगावरी शस्त्राने वार... 

शिवारात मृत्यूशी झुंज देणाऱ्या जन्मदात्रीस
अलगद पणे घे निजवणाऱ्या मिठीत तुझ्या 
परकी तुझी ती प्रेयसी आकर्षणाचा खेळ मांडूनी,
मिठीत निजुनी अंगात विष घालेन तुझ्या...

झाडाझुडपात अश्लील चाळे करुनी अन् आई-
वडिलांची मान खाली करुनी काय साध्य तू करणार 
पडूनी प्रेमात आई-वडिलांच्या अन् बहीणीच्या 
साजरा कर व्हॅलेंटाईन डे! कारण,तेच तुला आधार देणार..

-आदित्य आवारी 
adityaawari47@gmail.com