विशेष मिशन इंद्रधनुष मोहिमेच्या तिसर्‍या सत्रात १२६१ बालके व मातांना लसीकरण : डॉ कुणाल खेमणार, जिल्हाधिकारी #vaccination - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

विशेष मिशन इंद्रधनुष मोहिमेच्या तिसर्‍या सत्रात १२६१ बालके व मातांना लसीकरण : डॉ कुणाल खेमणार, जिल्हाधिकारी #vaccination

Share This
खबरकट्टा /चंद्रपूर: 

बालकामधील मृत्यु व आजारपणाचे प्रमाण कमी करण्यासाठी लसीकरण हे प्रभावी साधन आहे. तथापि नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणात असे आढळून आले आहे की अर्धवट लसीकरण झालेले तसेच लसीकरण न झालेली बालके हि पुर्ण लसीकरण झालेल्या बालकापेक्षा लवकर आजारी पडतात किंवा मृत्यु पावतात. यासाठी केंद्रशासनाने माहे डिसेंबर २०१९ पासुन महाराष्ट्र राज्यातील २५ जिल्हयात विशेष मिशन इंद्रधनुष २.० कार्यक्रम हाती घेतला आहे. 

या मोहिमेत लसीकरणापासुन वंचीत राहिलेले किंवा अर्धवट लसीकरण झालेल्या बालकांचा व गरोदर मातेचा शोध घेवुन विविध आजाराचे निर्मुलणाकरीता पोलीओ, रोटा व्हायरस, ओपीव्ही, पेंन्टा, मिझल इत्यादी लसीकरण करण्यात येणार आहे. त्यानुसार ग्रामिण, अर्बन व कार्पोरेशन भागात विशेष मिशन इंद्रधनुष २.० मोहिमेचे तिसरे सत्र माहे फेब्रुवारी २०२० सत्राकरीता डॉ. कुणाल खेमणार, जिल्हाधिकारी, चंद्रपूर व मा.राहुल कर्डिले, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. चंद्रपूर यांचे विशेष मार्गदर्शनाखाली व डॉ राजकुमार गहलोत, जिल्हा आरोग्य अधिकारी, जि.प.चंद्रपूर, डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा शल्य चिकित्सक, सा.रु.चंद्रपूर डॉ. संदीप गेडाम, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी, जि.प.चंद्रपूर, डॉ. किर्ती राजुरवार, वैद्यकिय अधिकारी, महानगरपालीका, चंद्रपूर यांचे नियोजनाखाली मोहीम राबविण्यात येत आहे. 

यावेळी चंद्रपूर जिल्हयात विशेष मिशन इंद्रधनुष २.० मोहिमेच्या तिसर्‍या सत्रात ग्रामिण, अर्बन व कार्पोरेशन भागातील १०८४ बालके व १७७ गरोदर मातांना असे एकुण १२६१ लाभार्थींना एकुन २८० लसीकरण सत्राचे आयोजन करुन लसीकरण करण्यात येणार आहे. तरी माहे फेब्रुवारी २०२० या महिण्यात राबविण्यात येणार्‍या लसीकरण सत्राचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे जनतेला केले आहे.