मोठी बातमी : अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचं पीक कर्ज माफ :मुख्यमंत्री उद्धव ठाकरे #udhhavthackeray - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

मोठी बातमी : अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचं पीक कर्ज माफ :मुख्यमंत्री उद्धव ठाकरे #udhhavthackeray

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :

शेतकऱ्यांचं जुलै ते ऑगस्ट 2019 मध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे पीकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठा निर्णय घेतला आहे.अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचं पीक कर्ज माफ होणार आहे. ठाकरे सरकारने हा निर्णय घेऊन पीडित शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचं वातावरण आहे.

जुलै ते ऑगस्ट 2019 राज्यात अवकाळी पाऊस झाला होता. या पावसामध्ये शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं होतं.हातातोंडाशी आलेलं पीक डोळ्यादेखत पाण्यागेलं होतं. त्याच शेतकऱ्यांना सरकारने मोठा दिलासा दिला आहे.

दरम्यान, उद्धव ठाकरेंनी आज राज्यातील सर्व शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट दिलं आहे. या निर्णयाचं सर्वत्र कौतूक होत आहे.