आता सरकारी कार्यालयांना सर्व शनिवारी सुट्टी : ठाकरे सरकार चा नवा निर्णय #udhhavthackeray - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

आता सरकारी कार्यालयांना सर्व शनिवारी सुट्टी : ठाकरे सरकार चा नवा निर्णय #udhhavthackeray

Share This
खबरकट्टा / महाराष्ट्र :


ठाकरे सरकारने राज्यातील सुमारे वीस लाख सरकारी कर्मचारी आणि अधिकारी यांना खूष करून टाकले असून त्यांच्यासाठी येत्या 29 फेब्रवारीपासून आता पाच दिवसांचा आठवडा असणार आहे. मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.


यासाठी रोजच्या कामात 45 मिनिटांची वाढ करण्यात येणार आहे. सध्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी सरकारी कार्यालये बंद असतात. आता महिन्यातील सर्व शनिवारी राज्य सरकारची कार्यालये बंद राहतील. केंद्र सरकारप्रमाणे आता राज्य सरकारचीही कार्यालये शनिवारी बंद राहतील. 


इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभागाचे नाव आता बदलण्यात आले असून त्याचे नाव " "बहुजन कल्याण विभाग" असे ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.


बाल न्याय निधी गठीत करण्यास मान्यता. त्यासाठी दोन कोटी रूपयांची तरतूद करण्यास मंत्रिमंडळाने आज मान्यता दिली. राज्याच्या हिरक महोत्सवी वर्षानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.