चंद्रपूर जिल्हा वृत्तवाहिनी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी नीलेश डहाट, सचिवपदी पवन झबाडे यांची निवड : पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचे विशेष अभिनंदन ! #tvnewschannel - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

चंद्रपूर जिल्हा वृत्तवाहिनी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी नीलेश डहाट, सचिवपदी पवन झबाडे यांची निवड : पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचे विशेष अभिनंदन ! #tvnewschannel

Share This
चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी इलेक्ट्रॉनिक मिडिया संघटनेच्या नवीन कार्यकारणी बद्दल अभिनंदन केले सोबतच  अध्यक्ष पदी tv9 न्युज चे निलेश डाहाट आणि सचिव पदी पवन झबडे यांची निवड झाल्या बद्दल विशेष शुभेच्छा दिल्या आहेत. 

खबरकट्टा / चंद्रपूर :


चंद्रपूर जिल्हा वृत्तवाहिनी पत्रकार संघाची आमसभा पार पडली. या सभेत जिल्हा कार्यकारिणी गठित करण्यासाठी निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. यात अध्यक्षपदी टीव्ही ९ चे जिल्हा प्रतिनिधी नीलेश डहाट, तर सर्च टिव्हीचे पवन झबाडे यांची सचिवपदी निवड करण्यात आली. 


वृत्तवाहिनी पत्रकार संघाची स्थापना करण्यात आल्यानंतर पहिलीच आमसभा रविवारी (ता. २) वनविभागाच्या रामबाग विश्रामगृहात पार पडली. सभेला ज्येष्ठ पत्रकार सुनील तायडे, विकास राजूरकर, सारंग पांडे, सुशांत घाटे, राजेश अलोने, राममिलन सोनकर यांची उपस्थिती होती. यावेळी दोन वर्षांसाठी नवीन कार्यकारिणीच्या निवडीसाठी निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. यावेळी अध्यक्षपदी नीलेश डहाट यांची बिनविरोध निवड करण्यात आली. 

तर, सचिवपदासाठी झालेल्या निवडणुकीत पवन झबाडे यांनी बाजी मारली. नवीन कार्यकारिणीत उपाध्यक्ष हबीब शेख, कोषाध्यक्ष बल्लू चव्हाण यांची निवड करण्यात आली. नवनियुक्त पदाधिकाèयांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे. आमसभेला जिल्ह्यातील वृत्तवाहिनी पत्रकारांची उपस्थिती होती.

निवड झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे टीम खबरकट्टा तर्फे हार्दिक अभिनंदन !!!