नोकराने चोरल्या दुकानातील सात टीव्ही #tv - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

नोकराने चोरल्या दुकानातील सात टीव्ही #tv

Share This
खबरकट्टा /चंद्रपूर: 


येथील एका एलईडी टीव्ही विक्री च्या दुकानात कामावर असलेल्या नोकरानेच चक्क एलईडी टीव्हीचे सात संच चोरल्याची घटना आज दि. १३ फेब्रुवारीला उघडकीस आली. 

या चोरट्या ला चंद्रपूर शहर पोलिसांनी अटक केली आहे.रमेश गोवर्धन उईके (३९) रा. एसपी कॉलेज जवळ गंजवार्ड असे आरोपीचे नाव आहे.प्रिन्स इलेकंट्रोनिक दुकानाच्या गोदामातून जवळपास दोन लाख रुपये किमतीच्या सात टीव्ही चोरी गेल्या असल्याचे दुकान मालक राजीव रविशंकर व्यास यांच्या लक्षात आले . त्यांनी तत्काळ शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली . तक्रारीवरून पोलिसांनी सर्व टीव्ही फिटिंग करून देणारे , घरपोच टीव्ही विकणाऱ्यांची चौकशी केली. दुकानातील नोकरांची चौकशी केली असता या दुकानात वर्षभराआधी रमेश उईके हा नोकर म्हणून कामावर असल्याचे कळले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने गुन्हा कबूल केला. शहर पोलिसानी संपूर्ण मुद्देमाल जप्त केला.