बिग ब्रेकिंग : राखी कंचर्लावार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यास जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी ! : तिरंगा अवमान प्रकरण भोवणार? याचप्रकारच्या प्रकरणात उमा भारतींना द्यावा लागला होता मुख्यमंत्री पदाचा राजीनामा ! #tiranga - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

बिग ब्रेकिंग : राखी कंचर्लावार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यास जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी ! : तिरंगा अवमान प्रकरण भोवणार? याचप्रकारच्या प्रकरणात उमा भारतींना द्यावा लागला होता मुख्यमंत्री पदाचा राजीनामा ! #tiranga

Share This
अश्याच एका प्रकरणात मध्यप्रदेश च्या मुख्यमंत्र्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याने तत्कालीन मुख्यमंत्री उमा भरती यांना राजीनामा द्यावा लागला होता त्यामुळे मनपा महापौरांचे हे प्रकरण कोणते वळण घेणार यावर राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधले आहे.
खबरकट्टा / चंद्रपूर :


26 जानेवारी गणतंत्र दिवसाच्या पूर्व सायंकाळी चंद्रपूर महापौर राखी कंचर्लावार यांचे शहरात विविध ठिकाणी शुभेच्छा फलक लागले होते. त्या फलकांमध्ये तिरंग्याच्या उलट्या रंगांचा वापर करण्यात आला होता. 

संदर्भात शुभेच्छा फलकांमध्ये राष्ट्रध्वज तिरंग्याचा अपमान केल्याची तक्रार एनएसयूआय च्या जिल्हा पधाधिकाऱ्यांनी निवेदनातून जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमणार यांचेकडे 27 जानेवारी ला केली होती. त्यात राष्ट्रीय गौरव अपमान निवारण अधिनियम 1971 अंतर्गत फ्लॅग कोड ऑफ इंडिया 2002 च्या नियमानुसार तात्काळ गुन्हा नोंदविण्यात येऊन योग्य कारवाही करण्याची विनंती एनएसयूआय चे रोशनलाल बिट्टू यांनी केली होती.

या विनंतीवर  राष्ट्रध्वजाचा अवमान करून संपूर्ण देशवासीयांच्या भावना दुखविणाऱ्या गंभीर प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यांना योग्य चौकशी करून तात्काळ गुन्हा नोंदविण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमणार यांनी दिले असून प्रकरणात महापौर कंचर्लावार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.