वाघ हल्ल्यातील मृतकांच्या वारसांना आमदार सुभाष धोटेंच्या हस्ते धनादेशाचे वितरण. #tigetattack - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

वाघ हल्ल्यातील मृतकांच्या वारसांना आमदार सुभाष धोटेंच्या हस्ते धनादेशाचे वितरण. #tigetattack

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : राजुरा-


              
इंदिरा नगर, राजुरा येथील वाघ हल्ल्यात मृत्यू झालेल्या मृतकाचे कुटुंबाला राजुरा विधानसभेचे लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांचे हस्ते प्राथमिक हप्ता म्हणून वन विभागाकडून 4 लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. उर्वरित मदत रक्कम काही दिवसात मृतकाचे वारसांच्या खात्यात जमा करण्यात येणार असल्याची माहिती वन परिक्षेत्र अधिकारी विदेशकुमार गलगट यांनी दिली आहे. 
           
विश्रामगृह राजुरा येथे हा धनादेश वितरण कार्यक्रम घेण्यात आला. या प्रसंगी नगराध्यक्ष अरुण धोटे,नगरसेविका गीता रोहने, उपविभागीय वन अधिकारी अमोल गरकल, वन परिक्षेत्र अधिकारी विदेश कुमार  गलगट आदी मान्यवर उपस्थित होते. 
          
वाघ हल्ल्यातील मृतकाचे परिवारातील इंदिरा नगर मधील मंगेश कोडापे यांच्या पत्नी गौरी कोडापे हिला आमदारांच्या हस्ते ४ लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला.