चंद्रपूर ब्रेकिंग : वाघाच्या हमल्यात शेतमजूर महिला ठार !#tigerattack - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

चंद्रपूर ब्रेकिंग : वाघाच्या हमल्यात शेतमजूर महिला ठार !#tigerattack

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :थोडक्यात 







मूल तालुक्यातील मौजा मोरवाही येथील रहिवासी सौ सरिता श्रीकृष्ण पाल वय 32 वर्ष शेतात काम करीत असताना वाघाने हल्ला केल्याने आज दिनांक 14/02/2020 रोजी दुपारी 2.00 वाजता मरण पावल्याची घटना उघडकीस आली.

मूल- शेतात लाख खोदणी करायला गेलेल्या महिलेवर वाघाने हल्ला करून महिलेला ठार केले. महिलेचे नाव सरिता पाल वय 32 राहणार मोरवाही येथिल रहिवासी आहे. सकाळी लाख खोदणी करायला आपल्याच शेतात गेली असता दुपारी 2 वाजताच्या दरम्यान दबा धरून बसलेल्या वाघाने काम करीत असलेल्या सरिता पाल या महिलेवर हल्ला करून ठार केले. सरिता पाल यांना 7 वर्षाची मुलगी व 11 वर्षाचा मुलगा असे दोन लहान मुले आहेत. सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. वनविभागाने वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी गावकरी करीत आहे.