अल्ट्राटेक कर्मचारी वसाहतीत शिरला वाघ : भीतीपोटी कंपनीत कर्मचारी, अधिकारी अडकून पडले #tiger - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

अल्ट्राटेक कर्मचारी वसाहतीत शिरला वाघ : भीतीपोटी कंपनीत कर्मचारी, अधिकारी अडकून पडले #tiger

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : कोरपना – 





कोरपना तालुक्यातील आवाळपूर सिमेंट वर्क्स या अल्ट्राटेक सिमेंट उद्योगाच्या वसाहतीती आज 15 फेब्रुवारीला सायंकाळी 6:30 च्या दरम्यान वाघ दिसल्याने कंपनी व्यवस्थापन व कर्मचारी वसाहतीत एकच खळबळ उडून भीतीचे वातावरण पसरले आहे. चंद्रपूर जिल्ह्याला चारही बाजूने वनाने वेढलेले आहे, वन्यप्राणी आता वसाहतीमध्ये यायला लागले आहे.

चारही बाजूने भिंतीच्या कुंपणाने वेढलेल्या या कर्मचारी वसाहतीत वाघ हा नेमका कोणत्या दिशेने आत शिरला प्रश्नचिह्न आहे. 


संपूर्ण वसाहतीमध्ये नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून , वनविभाग व अल्ट्राटेक प्रशासनाचे अधिकारी सध्या वसाहतीमध्ये तळ ठोकून बसले आहे.कोणतीही अनुचित घटना घडू  नये यासाठी वनविभाग खबरदारी घेत आहे.