ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाची पुनर्रचना #tadoba - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाची पुनर्रचना #tadoba

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे कोर विभागाचा पूनर्रचना प्रस्ताव उच्चस्तरीय स्थायी समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला आहे.त्यानुसार ताडोबा कोअर क्षेत्रात आता ताडोबा,कोळसा, मोहर्ली या तीन वनपरिक्षेत्रात कोलारा व कारवा या दोन नविन वनपरिक्षेत्राची भर पडली आहे. 

पूर्नरचना प्रस्तावानुसार ५ वनपरिक्षेत्र, १५ परिमंडळ आणि ६० नियतक्षेत्र राहणार आहेत.ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक एन.आर. प्रवीण यांनी प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन बल प्रमुख) यांचे कार्यालयात वनपरिक्षेत्र, परिमंडळ व नियमक्षेत्राच्या पूनर्रचनेचा प्रस्ताव पाठविला होता. त्यानुसार २७ जानेवारी रोजी प्रधान मुख्य वनसंरक्षक डॉ.एन.रामबाबु यांचे अध्यक्षतेखाली उच्च स्तरीय समितीची बैठक झाली. 

या बैठकीला प्रधान मुख्य वनसंरक्षक (अर्थसंकल्प, नियोजन व विकास) जी.साईनाथ,प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) नितीन काकोडकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक (माहिती,तंत्रज्ञान व धोरण) एम.के.राव, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक विकास गुप्ता, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक बि.एस.हुडा, मुख्य वनसंरक्षक, चंद्रपूर एस.व्ही.रामाराव, ताडोबाचे क्षेत्र संचालक एन.आर. प्रवीण उपस्थित होते.