ताडोबा प्रशासनाने अडविल्या जिप्सी : वनजमिनीवर अतिक्रमण करून उभ्या केल्या जातात जिप्सी #tadoba - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

ताडोबा प्रशासनाने अडविल्या जिप्सी : वनजमिनीवर अतिक्रमण करून उभ्या केल्या जातात जिप्सी #tadoba

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : थोडक्यात 

ताडोबा जंगल क्षेत्रातील जमिनीवर अतिक्रमण केलेल्या लोकांच्या जिप्सी ताडोबा प्रशासनानं आज अचानक अडवून ठेवल्यानं पर्यटकांत एकच गोंधळ उडाला.

ताडोबाच्या कोलारा प्रवेशद्वारावर हा सगळा प्रकार आज शुक्रवार दि. ७फेब्रुवारीला सकाळी ६ वाजता सुरू झाला.जंगल प्रवेशबंदी केल्याने सर्व जिप्सीमालकांनी गेटवर ठिय्या आंदोलन करुन इतर जिप्सीनांही रोखून धरले.

जिप्सीमालक आणि वन विभागाच्या या वादात पर्यटक भरडले जाऊ नये, म्हणून शेवटी साडेसात वाजताच्या सुमारास या सर्व जिप्सी ताडोबात सोडण्यात आल्या.ताडोबा जंगलातील कोलारा परिसरातील वनजमीनीवर अतिक्रमणाच्या माध्यमातून जिप्सी उभ्या केल्या जातात.