अखेर 'तो' मद्यपी शिक्षक निलंबित मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांची कारवाई #suspend - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

अखेर 'तो' मद्यपी शिक्षक निलंबित मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांची कारवाई #suspend

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : ब्रम्हपुरी -

पालकांनी समज देऊनही त्यांना न जुमानता रोज दारू पिऊन येणार्‍या तळीराम शिक्षकाला अखेर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डीले यांनी काल निलंबित केले. आता मात्र एक शिक्षक व वर्ग चार अशी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे दुसरे शिक्षक देण्याची मागणीही गावकर्‍यांनी केली आहे. बोडधा येथील जि.प.शाळेत कार्यरत सहायक शिक्षक दिलीप महादेव ढोक यांनी दि.२० सप्टेंबर २०१९ रोजी शालेय वेळेमध्ये मद्यप्राशन करून शालेय विद्यार्थ्यांना त्रास दिला.त्यांच्या अशा गैरवर्तणूकीमुळे गावातील गावकर्‍यांनी त्यांचे विरूद्ध पोलीस स्टेशन ब्रम्हपुरी येथे लेखी तक्रार नोंदविण्यात आली. तसेच ब्रम्हपुर येथील ग्रामीण रूग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यामध्ये सदर शिक्षक हे दारू पिऊन असल्याचा अभिप्राय मिळाल्याने त्यांचे विरूद्ध ब्रम्हपुरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदविण्यात आला. तसेच सदर शिक्षकाने महाराष्ट्र जिल्हा परिषद सेवा(वर्तवणुक) नियम १९६७ मधील नियम ३ चा भंग केलेला असल्यामुळे ते नियम १९६४ मधील तरतुदीनुसार शिस्तभंग कार्यवाहीस पात्र ठरले. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रपुर यांनी सदर शिक्षकाला निलंबित केले.सदर शिक्षकाविरोधात गावकर्‍यांनी ब्रम्हपुरी पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली होती. सदर शिक्षकावर गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रामकृष्ण हुलके यांनी केली होती. हुलके यांची मागणी मान्य करून कारवाई करण्याचे आश्वासन ब्रम्हपुरचे गटशिक्षणाधिकारी प्रमोद नाट यांनी दिले व तसा अहवाल जि.प.चंद्रपुर येथे सादर केला. या प्रकरणामध्ये वरिष्ठ अधिकार्‍यांनी लक्ष देऊन यानंतर ठोस पुराव्यांच्या आधारे मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रपुर यांनी सदर शिक्षकावर कारवाई करीत निलंबित केले.