तिहेरी आत्महत्या प्रकरणाला नवे वळण : प्रेम विवाह केलेल्या मुलीने प्रियकरासोबत आत्महत्या करण्याच्या केला प्रयत्न : पोलीस दलाच्या सतर्कतेमुळे वाचले प्राण #suicide - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

तिहेरी आत्महत्या प्रकरणाला नवे वळण : प्रेम विवाह केलेल्या मुलीने प्रियकरासोबत आत्महत्या करण्याच्या केला प्रयत्न : पोलीस दलाच्या सतर्कतेमुळे वाचले प्राण #suicide

Share This
खबरकट्टा /गडचिरोली:काल  दिनांक:११/०२/२०२०ला भावेश वरगंटीवर यांच्या फिर्यादी वरून आज रोजी उपविभाग गडचिरोली अंतर्गत येणाऱ्या पोलीस स्टेशन गडचिरोली हद्दीतील आनंदनगर येथे राहणारे नामे रविंद्र नागोराव  वरगंटीवर त्यांची पत्नी नामे सौ .वैशाली वरगंटीवर व मुलगा नामे साई वरगंटीवर यांनी आनंदनगर येथील शेतामध्ये असणाऱ्या विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची नोंद गडचिरोली पोस्ट येथे करण्यात आली आहे.
        
रवींद्र वरगंटीवर यांच्या मुलीने त्यांच्या संमतीशिवाय इतर मुलाशी विवाह केल्याने त्यांनी कुटुंबासहित आपले जीवन संपवले असल्याचे फिर्यादीने म्हंटले आहे.
      
घटनेनंतर गडचिरोली पोलिसांनी विहिरीतून मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनाकरिता जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविले.सदर घटनेतील रवींद्र वरगंटीवर यांची मुलगी व तिचा पती हे दोघेही तणावात असल्यामुळे दोघांनीही सोशल मीडियावर आत्महत्या करणार असल्याची ऑडिओ क्लिप टाकून घरातून निघून गेले.गडचिरोली पोलिसांनी तातडीने पाऊले उचलत सायबर सेल,गडचिरोली यांच्या मदतीने  माघ काढला असता दोघेही पोस्टे चामोर्शी हद्दीतील पोहर नदीवर असल्याचे निदर्शनास आले.गडचिरोली पोलीस दलाचे पथक तातडीने पोहर नदीच्या दिशेने रवाना झाले.

दोघेही विषारी औषध प्राशन करून नदीत उडी घेण्याच्या प्रयत्न करत असताना गडचिरोली  पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले.यानंतर त्यांना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालय,गडचिरोली येथे हलविण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.गडचिरोली पोलीस दल घटनेचा पुढील तपास करत आहेत.