गळफास घेऊन युवतीची आत्महत्या #suicide - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

गळफास घेऊन युवतीची आत्महत्या #suicide

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :ब्रम्हपुरी : 

तालुक्यातील अ-हेर नवरगाव येथे युवतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजणक घटना घडली आहे. युवतीचे नाव डिंपल सुधाकर गोटेफोडे वय वर्ष २४ असे असून अ-हेर नवरगाव येथील रहिवासी आहे.सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की, सदर घटना १७ फेब्रुवारी २०२० ला सकाळी ११:०० वाजताच्या सुमारास उघडकीस आली.डिंपलने घरी कुणी नसल्याचा फायदा घेत घरातील लाकडाच्या फाट्याला गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली.मृतक युवतीच्या पच्छात्य आई बाबा भाऊ व मृतक डिंपल असे एकून चार जण असा परिवार आहे.मृतक डिंपल ही घरातील व शेजारील लाडकी होती तिच्या जाण्याने गाव परिसर शोकसगरात बुडालेला आहे.

मृत्यूचे कारण अद्यापही कळू शकले नसून घटनेचा पुढील तपास ब्रम्हपुरी पोलीस विभागाचे मेजर विलास गेडाम करीत आहे.